Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक गुड न्युज आहे. पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रो संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी सिविल कोर्ट ते स्वारगेट यादरम्यानच्या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहे.
यासंदर्भात महा मेट्रोचे महाव्यवस्थापक, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी माहिती दिली आहे. सोनवणे यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 26 सप्टेंबरला सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
या मार्गावरील भूमिगत स्थानकांची सर्व कामे पूर्ण झाली असून, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट यादरम्यानचा प्रवास आता फक्त अन फक्त 10 मिनिटांत करता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या पुणे शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या मार्गावर मेट्रो धावत आहे.
आता सिविल कोर्ट ते स्वारगेट यादरम्यानही मेट्रो धावणार आहे. आज 26 सप्टेंबरला उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांना भूमिगत मेट्रोने प्रवास करता येणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून हा मेट्रो मार्ग नेमका कधी सुरू होणार ? याबाबत विचारणा केली जात होती.
या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाच्या वेगवेगळ्या तारखा देखील समोर येत होत्या. मात्र उद्घाटनाला प्रत्यक्षात मुहूर्त काय लागत नव्हता. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर असतांना या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.
या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन तर करणारच आहेत शिवाय याच्या विस्तारित मेट्रोमार्गाचे भूमिपूजन देखील होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रोमार्गाचे भूमिपूजन सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नियोजित आहे.
यामुळे भविष्यात स्वारगेटहुन कात्रज पर्यंत मेट्रो ने प्रवास करता येणार आहे. हा विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका पासून थेट कात्रज गाठता येणार आहे.
दरम्यान सिविल कोर्ट ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा प्रवास फक्त दहा मिनिटात पूर्ण होणार आहे. या मार्गावर तीन स्थानके आहेत. स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ हे तीन स्थानके आहेत. या मेट्रो मार्गाची लांबी 3.34 किलोमीटर एवढी आहे.