Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. वाहतूक कोंडीमुळे सांस्कृतिक राजधानी मधील नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान याच वाहतूक कोंडी पासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा या हेतूने शहरात मेट्रो मार्ग विकसित केले जात आहेत.
सद्यस्थितीला शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे. अशातच आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर सध्या जे मेट्रो मार्ग सुरू आहेत ते महा मेट्रोचे आहेत.
मात्र, आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अर्थातच पीएमआरडीएच्या माध्यमातून विकसित होणारा एक नवीन मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. शिवाजीनगर, बाणेर, बालेवाडी आणि हिंजवडी यांना जोडणारा मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाकडे आला आहे.
या मेट्रो मार्गाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत या मार्गाचे 74 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, ही 23.2 किलोमीटरची लाईन पुढील वर्षी मार्चपर्यंत सुरू होण्याच्या वाटेवर आहे.
या प्रकल्पासाठी सरकार अंदाजे 8,313 कोटींचा खर्च करत आहे. त्यामुळे पुण्यातील हजारो आयटी व्यावसायिक आणि इतर प्रवाशांच्या दैनंदिन वाहतूक समस्या लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. खरंतर पुण्यातील हिंजवडी हा आयटी हब म्हणून ओळखला जातो.
या ठिकाणी कामाला जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान याच कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाच्या माध्यमातून हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर विकसित होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे या तत्त्वावर तयार होणारा हा देशातील पहिलाच मेट्रो मार्ग आहे. पुण्यातील हे आयटी हब वाहतूक कोंडीसाठी कुख्यात आहेत, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या वैयक्तिक वाहनांमधून प्रवास करतांना बराच विलंब लागतो.
मात्र, भविष्यात शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो मार्गामुळे शहराच्या विकासात भर पडेल आणि प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी खरंतर नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये केली.
यानंतर या मार्गाचे काम सुरू झाले आणि आता याचे काम अंतिम टप्प्यात आला आहे. मार्च 2025 पर्यंत हा मेट्रो मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला होणार असल्याने याचा नक्कीच पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.