स्पेशल

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मार्गांवरील मेट्रोची चाचणीही झाली यशस्वी; आता ‘त्या’ तारखेला धावणार सुसाट, पहा सविस्तर

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. पुणे शिक्षणाच माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अन लाखो अधिकारी घडवणारे शहर म्हणून संपूर्ण राज्यात नावलौकिक. पण गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये वाहतूक कोंडी वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा फटका बसतो.

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला आता ट्रॅफिकिंग हब म्हणून ओळखल जातंय. दरम्यान वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. तसेच शहरांतर्गत प्रवास गतिमान करण्यासाठी मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. दरम्यान आता पुण्यातील मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक या दरम्यान लवकरच मेट्रो धावणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नाबार्डकडून डेअरी व्यवसायासाठी मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं कर्ज, पहा…

या पार्श्वभूमीवर प्रयत्न जोमात सुरू असून या मार्गावर काल नुकतेच चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असून लवकरच या मार्गावर आता मेट्रो सुरु केली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कालचाचणी दरम्यान ही मेट्रो ठीक ३.५० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून निघाली आणि ४.०७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानकात पोहोचली. म्हणजे हा प्रवास मात्र 17 मिनिटात पार झाला. निश्चितच या दोन स्थानकादरम्यान प्रवास गतिमान होणार आहे.

आता याची यशस्वी चाचणी झाली असल्याने या मार्गावर मेट्रो लवकरच सुसाट धावणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, 2022 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही 12 किमीची मेट्रो मार्गिका सुरु करण्यात आली आहे.

मात्र, ही मेट्रो सुरू झाल्यानंतर उर्वरित मेट्रो मार्ग अजूनही सुरू झाला नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पण आता लवकरच फुगेवाडी स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक-रुबी हॉल स्थानक या एकूण 12 किमीची मार्गिका लवकरच प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख : 2023 चा मान्सून कसा राहणार? केव्हा होणार पावसाचं आगमन, कधी होणार पेरण्या?, डख यांनी सांगितली सविस्तर…

यामध्ये काल सिविल कोर्ट ते रुबी हॉल यादरम्यान यशस्वी चाचणी देखील झाली आहे. आता या मेट्रो मार्ग प्रकल्पामधील जी काही उर्वरित कामे आहेत ती आठ ते दहा दिवसात पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आणि प्राधिकरणाचा मानस आहे.

दरम्यान दिल्लीहून एक पथक येऊन या मार्गीकेचे निरीक्षण करणार आहे. या मार्गीकांचे सीएमआरएस निरीक्षण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांना बोलावण्यात येणार आहे. यामुळे आता सीएमआरएस यांची मान्यता केव्हा मिळते यावरच हा मेट्रो मार्ग केव्हा सुरु होतो हे अवलंबून राहणार आहे.

हे पण वाचा :- दिलासादायक ! अखेर राज्य शासनातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न लागला मार्गी; वाचा सविस्तर

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts