Pune Nashik Railway : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक हे दोन औद्योगिक शहरे परस्परांना जोडली जावीत अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहेत. विशेष बाब म्हणजे शिक्षणाचे माहेरघर, राज्याचे सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वाईन सिटी म्हणून प्रसिद्ध नाशिक परस्परांना जोडली गेली तर या दोन्ही जिल्ह्यातील कृषी क्षेत्र पर्यटन क्षेत्र औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.
त्यामुळे आध्यात्मिक पर्यटन देखील वाढणार आहे. जस की आपणास ठाऊकच आहे नासिक आणि पुणे हे दोन्ही जिल्हे आध्यात्मिक दृष्ट्या देखील अति महत्त्वाची आहेत. यामुळे पुणे आणि नासिक ही दोन्ही महानगरे रेल्वे मार्गाने कनेक्ट केले जावेत अशी मागणी या दोन्ही जिल्ह्यातून वारंवार समोर आली आहे. दरम्यान पुणे नासिक रेल्वे मार्ग उभारणीसाठी प्रयत्न देखील सुरू झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात या रेल्वे मार्गाची घोषणा केली. महाविकास आघाडी सरकारने आपले कार्यकाळात या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. तत्कालीन दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट असल्याने त्यांनी या प्रकल्पामध्ये जातीने लक्ष घातले. मात्र मध्यंतरी राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर या प्रकल्पाला अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, आता या प्रकल्पाला महारेलकडून खोडा लगावण्यात आला आहे. खरं पाहता, पुणे-नाशिक नवीन दुहेरी मध्यम द्रुतगती ब्रॉडगेज लाइनच्या विद्युतीकरणासह बांधकामासाठी खासगी जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. मात्र नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकल्पामध्ये बाधित जमिनीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सध्या स्थितीला थांबवण्यात आली आहे.
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने अर्थातच महारेलकडून नासिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आमच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने या प्रकल्पाच्या संपादनाची प्रक्रिया थांबवली जावी अशी विनंती करण्यात आली आहे. या अनुषंगाने महारेल कडून एक पत्र देखील नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला निर्गमित झाल आहे. यामुळे आता या प्रकल्पाचे काय होणार, पुन्हा हा रेल्वे मार्ग प्रकल्प बारगळणार की काय? अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
पुणे-नासिक रेल्वे मार्गाबाबत सद्यस्थिती
आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा रेल्वे मार्ग नाशिक जिल्ह्यातील एकूण 22 गावात प्रस्तावित आहे. यामध्ये सिन्नर तालुक्यातील 17 गावे आणि नाशिक तालुक्यातील पाच गावांचा समावेश राहणार आहे.
जिल्ह्यातील या संबंधित गावात भूसंपादनाची जबाबदारी भूसंपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांच्या माध्यमातून पार पाडली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत या प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यातील 45 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया सुरळीत सुरू होती. मात्र आता महारेल कडून विनंती पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असल्याने ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
केव्हा सुरू होईल पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठीच भूसंपादन
जसं की आपणास ठाऊकच आहे पुणे नाशिक रेल्वे मार्गाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. मध्यंतरी या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय समितीकडून काही आक्षेप नोंदविण्यात आले होते. अशा परिस्थितीत हा रेल्वे मार्ग बारगळेल अशी चिंता व्यक्त होत होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वे मार्गाबाबत एक मोठी घोषणा देखील केली रेल्वे मार्ग सोबतच औद्योगिक कॉरिडॉर उभारण्याचा आपला मानस बोलून दाखवला. यामुळे या प्रकल्पाला दुसऱ्याच दिशेकडे घेऊन जाण्याचा वर्तमान सरकारचा घात असल्याचा आरोप विरोधकांच्या माध्यमातून लावण्यात आला.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला मात्र रेल्वे आणि महारेल याच्या माध्यमातून एक नवीन सुधारित अहवाल सादर करण्यास सांगितले. एकंदरीत या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाली होती. राज्य शासनाने निधी पुरवली असल्याने या मार्गासाठी भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर होते.
अशातच महारेलच्या मुंबईमधील वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक कार्यालयाला निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादन थांबवण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. या अनुषंगाने स्थानिक कार्यालयाकडून निधी उपलब्ध नसल्याने पुढील आदेशापर्यंत रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे कामकाज थांबवावे असे विनंती पत्र पाठवण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाची तसेच जमीन मूल्यांकनाची प्रक्रिया सध्या स्थितीला थांबवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.