Pune Nashik Travel : पुणे हे मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. औद्योगिक, पर्यटन, अध्यात्मिक दृष्ट्या पुणे शहराला अधिकच महत्त्व प्राप्त आहे. शिवाय नासिक देखील मध्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून कृषी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आले आहे.
अशा परिस्थितीत नाशिकहून पुण्याला रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात तसेच पुण्याहून देखील नाशिकला मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या दोन शहरा दरम्यान जलद प्रवासासाठी अद्याप थेट रेल्वेची सुविधा उपलब्ध नाही.
रेल्वे मार्गाने नाशिककरांना जर पुण्याचा प्रवास करायचा असेल तर सध्या कल्याणला जाऊन दुसऱ्या ट्रेनने पुण्याकडील प्रवास करावा लागतो. येत्या काही वर्षात मात्र पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई महापालिकेत नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल एक लाख रुपये महिना
सध्या या प्रस्तावित करण्यात आलेल्या नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला अंतिम मान्यता मिळालेली नाही. येत्या काही दिवसात मात्र याला मान्यता मिळेल आणि या प्रकल्पाचे काम सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे. तूर्तास नाशिककरांना पुण्याकडील प्रवास करण्यासाठी रस्ते मार्गाचाच वापर योग्य आहे.
मात्र रस्ते मार्गे प्रवास करण्यासाठी नाशिककरांना कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे ते नाशिक हा प्रवास सुलभ बनवण्यासाठी 2020 मध्ये खेड बायपासचे काम हाती घेण्यात आले.
या बायपासचे काम हाती घेतल्यानंतर प्राधिकरणाकडून हा बायपास जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि आता हा बायपास प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
पुणे नाशिक महामार्ग लगत बांधण्यात आलेल्या या खेड बायपास मुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील प्रवासाचा वेळ वाचणार आहे. खेड बायपासची एकूण लांबी 4.9 किलोमीटर असून यामध्ये चार लेन आणि सर्विस रोड तयार करण्यात आले आहेत.
या बायपास मुळे खेळ शहरात होणारी वाहतूक कोंडी सुटणार असून नाशिककडून येणाऱ्या वाहतुकीला पुण्याला जाताना वाहतूक कोंडीचा फटका बसणार नाही. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते नासिक हे 212 किलोमीटरचे अंतर पाच ते साडेपाच तासात पार केले जात होते.
वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अधिक वेळ लागत होता. परंतु आता प्रवासाच्या वेळेत जवळपास अर्ध्या तासाची बचत होणार आहे. यामुळे आता पुणे ते नाशिक हा प्रवास सुसाट होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नादच खुळा! चक्क पांढऱ्या जांभळाची केली लागवड, एका एकरात झाली 4 लाखांची कमाई, पहा ही यशोगाथा