Pune News : पुणे अन अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिवाळी सणाच्या आधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मंचर एस टी आगारातून मराठवाड्यासाठी एक नवीन बस सुरू करण्यात आली आहे. ही बस अहिल्यानगर मार्गे धावणार आहे.
या नवीन बससेवेमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील शंभर गावांमधील प्रवाशांची सोय होणार असा दावा केला जात आहे. या दोन्ही तालुक्यातील शंभर गावांमधील नागरिकांना जलद गतीने मराठवाड्यात जाता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंचर एसटी आगारातून छत्रपती संभाजी नगर साठी नवीन बस सेवा सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील या दोन्ही तालुक्यांमधून छत्रपती संभाजी नगरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच अधिक आहे.
दरम्यान हीच प्रवासी संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाच्या माध्यमातून मंचर ते छत्रपती संभाजीनगर असी नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या नवीन बससेवेचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले आहे.
याचे उदघाटन आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी याच्या हस्ते करण्यात आले असून या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र गेगजे, सचिव मोहंमद सलील सय्यद, वाहतूक नियंत्रक पुरुषोत्तम वायकर यांच्या सह एसटीचे चालक-वाहक उपस्थित होते.
या नव्या बससेवेमुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना जलद गतीने छत्रपती संभाजी नगरला जाता येणे शक्य होईल. जिल्ह्यातील शंभर गावांमधील नागरिकांना या बसेसेवेचा फायदा होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण या नव्या बससेवेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मंचर-छत्रपती संभाजी नगर नव्या बससेवेचे वेळापत्रक कसे राहणार?
एसटी महामंडळाच्या मंचर बस आगाराकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मंचर-संभाजीनगर एसटी बस मंचर बस स्थानक येथून सकाळी ६ वाजता सुटणार आहे.
नारायणगाव, आळेफाटा, नगर मार्गे संभाजीनगर येथे दुपारी १२.३० वाजता पोहचणार आहे. संभाजीनगर एसटी बस स्थानकातून दुपारी १ वाजता एसटी बस मंचरला मार्गस्थ होणार आहे.