Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता पुणे शहराचा विकास गेल्या काही दशकात विशेष उल्लेखनीय असा राहिला आहे. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असून आता पुणे शहर आयटी हब म्हणून जगात ख्यातीप्राप्त बनले आहे.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून आधीपासूनच नावलौकिक मिळवलेल्या या पुणे शहरात आयटी कंपन्यांनी आता बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
या वाहतूक कोंडीवर उपाययोजना देखील केल्या जात आहेत. याच उपाययोजनेचा भाग म्हणून विमान नगर ते वाघोली पर्यंत तीन मजली उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. नगर रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
या तीन मजली उड्डाणपुलावर मेट्रो चालवली जाणार आहे. दरम्यान या उड्डाणपूलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थातच डीपीआर म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याच्या सूचना राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकत्याच दिल्या आहेत. शुक्रवारी अर्थातच काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात या संदर्भात पाहणी केली.
या पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही सूचना दिली आहे. पवार यांनी या पाहणी दौऱ्या दरम्यान या उड्डाणपुलाची सविस्तर अशी माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतमाला परियोजनेअंतर्गत देशभरात वेगवेगळी ग्रीनफिल्ड कॉरिडोर अर्थातच महामार्ग विकसित करण्याचे काम सुरू आहे.
या ग्रीन फील्ड कॉरिडॉर मध्ये पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचा देखील समावेश आहे. याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात आहे. या ग्रीनफिल्ड कॉरिडॉर अंतर्गत शिक्रापूर ते वाघोलीपर्यंत तीनमजली उड्डाणपूल करण्यात येणार आहे, तो थेट विमाननगरमधील हयात हॉटेलपर्यंत करण्यासंबंधीचा आराखडा तयार करावा. याचसंदर्भात राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.