Pune News : पुणे रेल्वे भागाला यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन रेल्वे मार्ग उभारणीसाठी 122 कोटी रुपये, रेल्वे लाईन दुहेरी करण्यासाठी 900 कोटी रुपये तसेच मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस साठी आवश्यक पिट लाईन उभारण्यासाठी 50.45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहे.
पुणे रेल्वे विभागाला मिळालेल्या निधीतून खालील कामे पूर्ण केली जाणार
ही नवीन रेल्वे लाइन विकसित होणार
बारामती-लोणंद रेल्वे लाईन उभारणीसाठी १०० कोटी रुपये मंजूर झाली आहेत
पुणे-नाशिक १ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. म्हणजे अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने या लाईन साठी निधीची तरतूद झालेली नाही.
फलटन-पंढरपूर रेल्वे लाईन उभारणीसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
हातकणंगले-इचलकरंजी रेल्वे लाईन उभारणीसाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत
या रेल्वे लाइनचे होणार दुहेरीकरण
दरम्यान या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या निधीतून पुणे-मिरज लोंडा या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार असून यासाठी ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जंक्शन / स्टेशन उभारणीसाठी मंजूर झालेला निधी
हडपसर टर्मिनलसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पुणे यार्ड रिमोल्डिंग २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रेल्वे पुलांसाठी इतका मिळणार निधी
मिरज कोल्हापूर जॅकेटिंगचे काम करण्यासाठी 50 लाखाचा निधी मिळणार आहे.
मिरज कोल्हापूर ब्रिज गर्डरसाठी 78 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
पुणे दौंड पूलसाठी १५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.
लोणावळा पुणे पूल- ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे
या वर्कशॉपसाठी मंजूर झाला निधी
पुणे डिझेल लोको शेडची क्षमता वाढवन्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मध्य रेल्वेच्या स्थानकाचे तिसऱ्या टप्प्यातील अपग्रेडेशनसाठी ४०३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेच्या स्थानकाचे दुसया टप्प्यातील अपग्रेडेशनसाठी २०० कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे.
रोड ओव्हर ब्रिज (उड्डाणपूल) साठी पण मंजूर झाला निधी
१०९ पुणे मिरज उड्डाणपुलासाठी ३.८५ कोटी मंजूर झालेत
१३० पुणे मिरजसाठी १ कोटी मंजूर झालेत
९२ पुणे मिरजसाठी ४.३५ कोटी मंजूर झालेत