Pune News : मुंबई, पुणे आणि नाशिक हे तिन्ही शहरे महाराष्ट्राचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जातात. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखतात. पुण्यामध्ये विविध शैक्षणिक संस्था आहेत.
त्यामुळे शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी या शहरात लाखो विद्यार्थी स्थायिक झालेले आहेत. दुसरीकडे शहरात अलीकडे वेगवेगळ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवलेले आहे.
शहरात मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये राज्यासहित देशभरातील कानाकोपऱ्यातील नागरिक कामानिमित्त पुण्यात आपले बस्तान बसवत आहेत. यामुळे पुणे शहरात सातत्याने उंच-उंच इमारती विकसित केल्या जात आहेत.
निवासी आणि व्यावसायिक कामानिमित्त मोठमोठ्या इमारती तयार होत आहेत. पुणे शहरातच नाही तर पुणे उपनगरांमध्ये देखील उंचच-उंच इमारती विकसित होत असून आज आपण पुण्यातील टॉप तीन उंच इमारतींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ब्लू रिज : पुण्यातील सर्वाधिक उंचीच्या इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश होतो. उंचीच्या बाबतीत ही शहरातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी इमारत म्हणून ओळखली जाते. पुणे शहरातील ज्या भागात आयटी कंपन्या आहेत म्हणजेच हिंजवडी भागात ही इमारत स्थित आहे.
या इमारतीबाबत बोलायचं झालं तर ही इमारत 2014 मध्ये पूर्णपणे विकसित झाली. या इमारतीची उंची ही जवळपास 118 मीटर म्हणजेच 387 फूट एवढी आहे. या इमारतीत एकूण 32 मजले आहेत.
अमानोरा ॲड्रेनो टॉवर्स : ही पुण्यातील आणखी एक सर्वाधिक उंचीची इमारत. विशेष बाब अशी की, ही इमारत सुद्धा पुण्यातील हडपसर भागातच स्थित आहे. हे पुण्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच टॉवर आहे. या इमारतीची उंची ही जवळपास 119 मीटर म्हणजेच 390 फूट आहे.
ही पुण्यातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक उंचीची इमारत म्हणून ओळखली जात असून या इमारतीत एकूण 35 मजले आणि पाच टॉवर आहेत. ही इमारत दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2022 मध्ये पूर्णपणे विकसित झाली आहे.
अमानोरा गेटवे टॉवर्स : मुंबई प्रमाणेच पुणे शहर देखील आता उंच-उंच इमारतीसाठी ओळखले जाऊ लागले आहे. राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजेच पुण्यात सर्वाधिक उंचीची इमारत म्हणून अमानोरा गेटवे टॉवर्सला ओळखले जाते. ही शहरातील सर्वाधिक उंचीची इमारत आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर येणारी ही इमारत 541 फोटो म्हणजेच 165 मीटर एवढी उंचीची असून यामध्ये एकूण 45 मजले आहेत. या इमारतीत दोन टॉवर्स आहेत. ही इमारत आजपासून तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2021 मध्ये बांधून तयार झाली होती.