Pune Railway : सध्या महाराष्ट्रात महामार्गांसमवेतच रेल्वे मार्गांची कामे जलद गतीने पूर्ण केली जात आहेत. दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरात मेट्रो रेल्वे मार्ग तसेच उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातून रेल्वे संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.
खरं पाहता, पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या मार्गीकेसंदर्भात एक माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या रेल्वेमार्गिकेसाठी आवश्यक असलेली 18 एकर शेतजमीन भूसंपादित झाली आहे. विशेष म्हणजे रेल्वे लाईनचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान या दुहेरी रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर या रूट दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यामुळे कामगार, कास्तकार, व्यापारी तसेच इतर सामान्य नागरिकांना प्रवास करताना सोयीचे होणार आहे. या रेल्वे लाईन मुळे परिसरातील शेतकऱ्यांना उद्योगांना एक नवीन उभारी मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या रेल्वे लाईनसाठी भूसंपादित झालेल्या 18 हेक्टर जमिनीच्या मोबदल्यापोटी संबंधितांना 47 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
भूसंपादनाच्या कामात पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण सोळुंके यांनी समन्वयन राखत भूसंपादन कार्याला गती दिली आणि लवकरात लवकर या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या रेल्वे मार्गीकेसाठी आवश्यक जागेचे भूसंपादन अवघ्या आठ महिन्यात पार पाडण्यास संबंधितांना यश आले आहे. यामुळे या दुहेरी रेल्वेमार्गिकेचे काम लवकरच मार्गी लागणार असून प्रवासासाठी ही मार्गीका खुली होणार आहे.
या ब्लॉक सेक्शनमधील कामे झालीत पूर्ण
रेल्वे विभागाने विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीचा ताबा पूर्वीच घेऊन ठेवला होता. आता या मार्किकेचे काम जवळपास पूर्ण करण्यात आले आहे. पुणे/घोरपडी- सासवड रोड, सासवड रोड- फुरसुंगी, फुरसुंगी-आळंदी, दौंडज- वाल्हा, आळंदी- शिंदवणे, आंबळे- राजेवाडी, राजेवाडी- जेजुरी, जेजुरी – दौंडज आणि वाल्हा – निरा या ब्लॉक सेक्शनमधील कामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. भराव, लहान-मोठे पूल, रेल्वे ओलांडणी पूल, अंडरपास इत्यादी कामे मात्र अद्याप सुरु आहेत. मात्र ही कामे देखील जलद गतीने सुरू असून लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याचा मानस रेल्वे विभागाने बोलून दाखवला आहे.
पुणे मिरज दुसरी मार्गिकेबाबत थोडक्यात….
पुणे-मिरज रेल्वे दुसरी मार्गिका ही २८० कि.मी. लांब आहे. हा रेल्वे मार्गे पुणे जिल्ह्यातून 35 कि.मी. अंतर कापत आहे. या प्रकल्पात पुणे जिल्ह्यातील 14 गावे बाधित झाली आहेत. यासाठी एकूण १८ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आंबळे, बेलसर, धालेवाडी, दौंडज, पिंपळे खुर्द, वाल्हा, पिसुर्टी, थोपटेवाडी, जेजुरी तसेच हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, फुरसुंगी आणि वळती व दौंड तालुक्यातील डाळिंब व ताम्हणवाडी या गावातून हा रेल्वे मार्ग जात आहे.
या रेल्वेमार्गिकेसाठी १३.१० हेक्टर जमीन ही खाजगी आहे. तर सरकारी जमीन ०.३४७५ हेक्टर आणि वन विभागाची ४.५५ हेक्टर जमीन आहे. निश्चितच या रेल्वेमार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून रेल्वे मार्गे देखील पूर्ण होण्याच्या वाटेवर असल्याने या रूट दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय होणार आहे.