Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे हडपसर रेल्वे स्थानकावरून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
खरंतर सणासुदीच्या दिवसात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या अतिरिक्त गर्दीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
अनेकांना तर कन्फर्म तिकीट सुद्धा मिळत नाही. दरम्यान प्रवाशांची हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हडपसर ते हिसार दरम्यान विशेष एक्सप्रेस चालवण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील तब्बल 23 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार.
दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कसं राहणार हडपसर-हिसार विशेषचे वेळापत्रक
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-हिसार विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०४७२४) ४ नोव्हेंबरला हडपसर येथून दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी हिसारला पोहचणार आहे.
हिसार-हडपसर विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०४७२३) ३ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी सोडली जाईल अन दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी हडपसरला पोहचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, भवानी मंडी,
कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, रिंगस, सीकर, नवलगढ, चिरवा, लोहारू आणि सरदुलपूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.