स्पेशल

पुणे रेल्वे विभागावर पडला पैशाचा पाऊस ! नवीन रेल्वे लाईनसाठी 122 कोटी, रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी 900 कोटीचा निधी झाला मंजूर, ‘ही’ रेल्वे कामे आता होणार पूर्ण

Pune Railway News : यंदाचा अर्थसंकल्प रेल्वे विभागासाठी विशेष फायद्याचा ठरला आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा रेल्वे विभागासाठी 2.40 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा निधी अधिक आहे. 2009 ते 2014 पर्यंत येणाऱ्या निधीची तुलना केली असता यंदाचा निधी हा 11 पट अधिक आहे.

साहजिकच यामुळे देशातील रेल्वे विकासाची कामे अधिक गतिवान होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील काही प्रलंबित रेल्वे विकासाची कामे मार्गी लागणार आहेत. दरम्यान या निधी मधून पुणे रेल्वे विभागासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.

कोणत्या विभागाला किती निधी मिळतो याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून होती.

दरम्यान आता पुणे विभागाला मिळालेल्या निधीची माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुणे रेल्वे विभागाअंतर्गत नवीन रेल्वे लाईन विकासासाठी 122 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. याशिवाय पुणे रेल्वे विभागाच्या माध्यमातून सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 900 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे साहजिकच पुणे रेल्वे विभागाच्या माध्यमातून जी काही प्रलंबित रेल्वेची कामे आहेत ती आता मोठ्या गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. एवढेच नाही तर या अर्थसंकल्पात नव्याने सुरू होणाऱ्या मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पिट लाईन उभारणीसाठी पुणे विभागाला 50.45 कोटी रुपयांचा निधी देऊ करण्यात आला आहे.

म्हणजेच यंदाचा अर्थसंकल्प रेल्वे विभागासाठी अति महत्त्वाचा ठरला असून यामुळे पुणे रेल्वे विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता कामे पूर्ण केली जाणार आहेत. दरम्यान आज आपण पुणे रेल्वे विभागाला मिळालेल्या निधीच्या माध्यमातून कोण कोणती कामे केली जातील याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

पुणे रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या या रेल्वे मार्गाची कामे मार्गी लागणार, हे नवीन रेल्वे मार्गही विकसित होणार ; पहा डिटेल्स

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts