Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्याहून लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, 13 जानेवारीपासून श्रीक्षेत्र प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 13 जानेवारीपासून ते 25 फेब्रुवारी पर्यंत या कुंभमेळ्याचे आयोजन राहणार असून कुंभमेळ्यासाठी देशभरातील भाविक श्री क्षेत्र प्रयागराज या ठिकाणी गर्दी करणार आहेत.
दरम्यान याच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून एका मोठा निर्णय घेण्यात आला असून पुण्यातून भारत गौरव ट्रेन चालवली जाणार आहे. कुंभमेळ्याचा हा सोहळा ४४ दिवस चालणाऱ, या कुंभमेळ्यात फक्त देशातीलच नाही तर परदेशातील भाविक सुद्धा सहभागी होतील.
पुण्यातीलही असंख्य लोक कुंभमेळायला जाणार आहेत. म्हणून पुणेकरांसाठी खास भारत गौरव ट्रेन चालवली जाणार असून यामुळे कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची एक मोठी सोय होणार आहे. राज्यभरातील भाविकांना, नागरिकांना कुंभमेळ्यामध्ये सहभागी होता यावे यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी पुण्यातून खास भारत गौरव रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना दिलासा मिळणार असून ही गाडी 15 जानेवारीला चालवली जाणार आहे.
म्हणजेच कुंभमेळा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच ही ट्रेन सुटणार आहे. पुण्यावरून प्रयागराजला जाणारी भारत गौरव ही विशेष ट्रेन १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे.
केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेअंतर्गत भारत गौरव ही विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. नक्कीच भारत गौरव रेल्वे कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी एक चांगला विकल्प ठरणार आहे यात शंकाच नाही.
फक्त पुण्यातूनच नाही तर राज्यातील इतरही शहरांमधून कुंभमेळ्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत हे विशेष. त्यामुळे राज्यातील इतरही शहरांमधील भाविकांना कुंभमेळ्याला जाणे सोपे होईल. प्रयागराजला जाण्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांसाठी देखील विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद, काचीगुड-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद या विशेष रेल्वे प्रयागराज छिवकीमार्गे चालविण्यात येणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून समोर आली आहे.