Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुण्यावरून विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. पुणे ते मऊ जंक्शनदरम्यान अतिरिक्त कुंभमेळा विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय झाला आहे.
यामुळे पुण्यावरून कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 12 वर्षांनी प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार असून हा कुंभमेळावा तब्बल 44 दिवस सुरू राहणार आहे.
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने येथे भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. पुण्यातीलही अनेकजण श्रीक्षेत्र प्रयागराज येथे गर्दी करणार आहेत. दरम्यान हीच अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण पुणे ते मऊ दरम्यान धावणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक अन ही विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याबाबत अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुणे-मऊ कुंभमेळा स्पेशल ट्रेन ही १६ व २४ जानेवारी, ६, ८ आणि २१ फेब्रुवारी राेजी पुण्याहून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी निघेल आणि पुढच्या दिवशी रात्री ११ वाजता पोहोचणार आहे.
म्हणजे पुणे ते मऊ दरम्यान या विशेष गाडीच्या एकूण पाच फेऱ्या होणार आहेत. तसेच मऊ-पुणे कुंभमेळा विशेष गाडी मऊ येथून १७, २५ जानेवारी आणि ७, ९ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून, तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.
म्हणजेच या गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. अर्थातच या विशेष गाडीच्या पुणे ते मऊ दरम्यान पाच आणि मऊ ते पुणे दरम्यान 4 अशा एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
या गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
कोणत्या स्थानकावर थांबा घेणार?
या विशेष गाडीला दोन्ही बाजूने दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवडिया, छनेरा, खिरकीया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छियोकी, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.