Pune Railway News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे ते कोकण असा प्रवास करायचा असेल तर आता आणखी एक नवीन पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे. रेल्वे लवकरच एक विशेष गाडी चालवणार आहे. ही गाडी पुणे ते करमळी अशी सुरू केली जाणार असून या गाडीचा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
खरे तर नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण कोकणात पिकनिकचा प्लॅन बनवतात. दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय राहिलेली आहे.
तदनुषंगाने पुण्याहून कोकणात जाण्याकरिता विशेष गाडी चालवली गेली पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून उपस्थित होत होती आणि याच मागणीच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने या विशेष गाडीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. नक्कीच जर तुमचाही नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात किंवा गोव्याला जाण्याचा प्लॅन असेल तर ही गाडी तुमच्यासाठी फायदेमंद ठरणार आहे.
दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी नेमक्या कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार, कोकणातील कोणत्या स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आलेला आहे याबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे-करमाळी विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक खालील प्रमाणे
रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्र. 01407 पुणे- करमळी- दर बुधवारी 25 डिसेंबर,1 जानेवारी, 8 जानेवारी 05.10 वाजता सुटणार- त्याच दिवशी 20.25 वाजता करमळीला पोहोचणार आहे. म्हणजेच या विशेष एक्सप्रेस गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होणार आहेत. ही गाडी आठवड्यातून केवळ एकदा चालवली जाणार आहे. ही साप्ताहिक गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेईल.
करमाळी पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे राहणार
मिळालेल्या माहितीनुसार करमळी पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन दर बुधवारी 25 डिसेंबर, 1 जानेवारी, 8 जानेवारी 22.00 वाजता सुटणार आहे आणि ही विशेष गाडी दुसऱ्या दिवशी 13.00 वाजता पुण्याला पोहोचणार आहे. म्हणजेच या गाडीच्या देखील तीन फेऱ्या या ठिकाणी होणार आहेत.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
पुणे ते करमाळी दरम्यान धावणारी ही विशेष गाडी या मार्गावरील चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्थानकावर थांबणार अशी माहिती रेल्वे प्रशासनात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.