Pune Railway News : सध्या संपूर्ण राज्यभर किंबहुना संपूर्ण देशभर कडाक्याची थंडी पडत आहे. या थंडीच्या दिवसांमध्ये अनेकजण बाहेर पिकनिकला जाण्याच्या तयारीत आहेत. पिकनिकचा विषय निघाला की, सर्वप्रथम गोव्याचे नाव आपल्या ओठांवर येते.
अनेक जण गोव्याच्या ट्रिपचा प्लॅन करत असतात. दरम्यान आज आपण अशाच पर्यटकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. विशेषतः पुण्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी आजची माहिती कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण पुण्यातून गोव्याला जाण्यासाठी किती ट्रेन उपलब्ध आहेत आणि त्यांचे टाईम टेबल कसे आहेत, तसेच या गाड्यांचे तिकीट दर नेमके कसे आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
खरंतर पुण्याहून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने पुणेकर पिकनिकसाठी जातात. अशा परिस्थितीत जर तुमचाही पुण्याला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे.
गोव्याला जाण्यासाठी उपलब्ध ट्रेन्स
पुणे ERS एक्सप्रेस – ट्रेन क्रमांक 22150 : ही ट्रेन थेट पुणे रेल्वे स्थानकावरूनच गोव्यासाठी सोडली जाते. ही गाडी पुण्यातून सायंकाळी 6:45 वाजता निघते आणि सकाळी 7:00 वाजता गोव्याला पोहोचते. तुम्ही जर या गाडीने गोव्याला जाणार असाल तर तुम्हाला सव्वा बारा तासांचा कालावधी लागू शकतो.
गोवा एक्सप्रेस – ट्रेन क्रमांक 12780 : खरे तर ही ट्रेन दिल्लीवरून सुटते आणि पुण्यामार्गे गोव्याला जाते. ही ट्रेन पुण्यातून दुपारी 5 वाजून 10 मिनिटांनी निघते आणि पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी गोव्याला पोहोचते. या ट्रेनला पुण्यावरून गोव्याला पोहोचण्यासाठी सुमारे 12 तास 30 मिनिटे लागतात.
पूर्णा एक्सप्रेस – ट्रेन क्रमांक 11097 : रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन पुण्याहून शनिवारी रात्री 10:25 वाजता सुटते आणि गोव्याला दुसऱ्या दिवशी दुपारी 12.55 वाजता पोहोचते. त्यामुळे जर तुमचाही गोव्याला जाण्याचा प्लॅन असेल तर ही ट्रेन तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
AII SBC गरीब नवाज – ट्रेन क्रमांक 16531 : गरीब नवाज ट्रेन ही गोव्याला जाणाऱ्यांसाठी एक बेस्ट पर्याय ठरते. पण ही ट्रेन साप्ताहिक आहे. ही गाडी दर मंगळवारी रात्री 1:50 वाजता पुण्यावरून सुटते आणि 11:03 वाजता गोव्याला पोहोचते.
किती भाडे लागते?
पुण्यावरून गोव्याला प्रवास करण्यासाठी प्रवाशांना चारशे रुपयांपासून ते 3200 पर्यंतचे तिकीट काढावे लागू शकते. यात स्लीपर क्लासने प्रवास करायचा असेल तर 400 ते 600 रुपये, थर्ड एसीने प्रवास करायचा असेल तर 1,100 ते 1,400 रुपये, सेकंड एसीने प्रवास करायचा असेल तर 1,600 ते 2,100 रुपये आणि फस्ट एसी ट्रेन ने प्रवास करायचा असेल तर 2,500 ते 3,200 रुपये मोजावे लागू शकतात.