Pune Ring Road Land Acquisition : सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यास सक्षम असलेल्या पुणे रिंग रोड बाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. खरं पाहता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला हा रिंग रोड 172 किलोमीटर लांबीचा आहे. विशेष म्हणजे या वर्तुळाकार रस्त्याची 110 मीटर रुंदी आहे.
या प्रकल्पाचे काम 80% जमिनीचे भूसंपादन झाल्यानंतरच करता येणार असल्याने भूसंपादनासाठी आवश्यक जमीन मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा प्रोजेक्ट एकूण दोन भागात विभागला गेला आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात या प्रकल्पाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे.
दरम्यान या प्रोजेक्ट अंतर्गत पूर्व भागात मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील वैभवात भर घालणारा आणि शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासं सक्षम असा हा रोड पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावातून प्रस्तावित करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी २२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच बीओटी तत्त्वावर राबविल्यास अपेक्षित प्रकल्पाची किंमत २६ हजार ८१८.८४ कोटी एवढी राहणार आहे. विशेष म्हणजे एकूण भूसंपादनाचा खर्च हा सुमारे ११ हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. तसेच रस्ता बांधणीसाठी अंदाजे खर्च हा सात हजार कोटी अपेक्षित आहे.
निश्चितच या प्रोजेक्टमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी संबंधित गावातील एकूण ६९५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्यानुसार जमिनींच्या मुल्यांकनाची प्रक्रिया देखील नुकतीच पार पडली आहे. दरम्यान आता या रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे.
या रिंग रोड साठी जमीन भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी विशेष अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून या शिबिरांचे आयोजन होणार आहे. दरम्यान एका रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर या प्रोजेक्टमध्ये जमिनी जाणाऱ्या जमीनदारांनी जर स्वच्छेने शिबिरात आपली जमीन एमएसआरडीसीकडे हस्तांतरित केली तर त्यांना शिबिरातच प्रकल्पात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला हा दिला जाणार आहे.
म्हणजे लगेचच शेतकऱ्यांना बाधित जमिनीचा मावेजां हा धनादेशच्या माध्यमातून मिळून जाणार आहे. निश्चितच यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता पहिल्या टप्प्यात मावळ आणि मुळशी तालुक्यातील एकूण 26 गावात पुढील आठवड्यापासून शिबिर आयोजित करून भूसंपादनाचा मोबदला देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
भूसंपादनाचा अंतिम मोबदला ठरवताना संबंधित जमीनदारांना विश्वासात घेण्यात आले आहे. जागेचे मूल्यांकन करताना जागेवर असलेले निवासी बांधकाम, व्यावसायिक बांधकाम, फळबागा, विहिरी, बागायती क्षेत्र, कोरडवाहू क्षेत्र यांसारख्या बाबींचा विचार करून जागा मालकाला विचारात घेऊन अंतिम दर ठरवण्यात आला आहे.
निश्चितच पुढील आठवड्यापासून भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी गावोगावी कॅम्प आयोजित होणार असून पहिल्या टप्प्यात मावळ आणि मुळशी तालुक्यातील एकूण 26 गावात ही शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांचे संमतिपत्र घेऊन त्यांना जागेवरचं धनादेशच्या स्वरूपात जागेचा मावेजां हा दिला जाणार आहे.