स्पेशल

शेवटी निर्णय झालाच ! पुणे रिंगरोडचे काम ‘या’ महिन्यात होणार सुरु; बाधित जमीनदारांच्या मोबदल्यात पण झाली ‘इतकी’ वाढ? पहा…..

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या रिंगरोडसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या पुणे रिंग रोडचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागण्यात आले आहे. दरम्यान या पुणे रिंगरोड संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोडच्या कामासाठी पात्रता निविदा नुकतीच राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच निविदा भरण्यासाठी सहा महिन्यांच्या कालावधी देण्यात आला आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

म्हणजेच आता पुणे रिंग रोडचे काम दिवाळीपासून सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. म्हणजेच नोव्हेंबर 2023 पासून पुणे रिंग रोडच्या कामाला सुरुवात होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून ज्या रिंगरोडची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या रिंग रोडचे काम आता येत्या दिवाळीपासून सुरू होणार आहे.

यामुळे पुणेकरांना येत्या काही वर्षात पुणे रिंग रोडचा प्रत्यक्षात लाभ होणार आहे. यामुळे पुणेकरांच्या माध्यमातून तसेच पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा हवामान अंदाज; अवकाळीच संकट अजून गेले नाही, पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या या रिंगरोडसाठी 15 हजार 875 कोटींची पात्रता निविदा प्रसिध्द झाली आहे.

विशेष बाब म्हणजे रिंग रोड प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमीनदारांना त्यांच्या संपादित होणार्‍या जमिनींच्या मोबदल्यात किमान 5 ते 6 टक्के वाढीव मोबदला दिला जाणार असल्याची माहिती देखील या मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. निश्चितच यामुळे रिंग रोड मध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुनी पेन्शन योजनाही लागू होईल अन सेवानिवृत्तीचे वय देखील 65 वर्षे होणार, अभ्यास समिती घेणार निर्णय?

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts