Pune Ring Road :- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पुणे रिंग रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी या दृष्टिकोनातून या रिंगरोडचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
जवळपास या रिंग रोडसाठी आवश्यक असणारे भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. परंतु एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या रिंग रोडच्या आखणीमध्ये पूर्व हवेली तालुक्यातील शिंदवणे व वळती या गावात तिसऱ्यांदा बदल करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता आखणीत बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी पुन्हा नोटीस देण्यात येऊन मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
रिंग रोडच्या आखणीत होणार बदल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पुणे रिंग रोडच्या आखणीमध्ये पूर्व हवेली तालुक्यातील शिंदवणे व वळती या गावात बदल करण्यात येणार असून त्याकरिता शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस देऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
या आखणीमध्ये बदल करण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रस्तावित असलेल्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवेला केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून मंजुरी न मिळाल्याने हा बदल करण्यात आला आहे. या भागामध्ये रिंगरोड करिता पुणे ते छत्रपती संभाजी नगर प्रस्तावित मार्गाकरिता वळती व शिंदवणे या गावात वर्तुळाकार पद्धतीने हे महामार्ग एकमेकांना जोडले जाणार होते.
परंतु पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली नसल्यामुळे या दोन्ही महामार्गांची जोडणी करण्याच्या उद्देशाने जी काही रचना करण्यात आलेली होती ती आता रद्द झाल्यामुळे साधारणपणे पाचशे मीटर अंतरावर भूसंपादनात बदल करण्यात आला असून आता जास्तीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.
आता पुन्हा भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या हरकती नोटिसा, मिळकतींचे निवाडे अशा प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत. त्यानुसार आता भूसंपादनासाठीच्या नोटिसा शेतकऱ्यांना पाठवून मोजणीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भूसंपादनाची प्रक्रिया हवेलीतून सोलापूर रस्त्या मार्गे पुरंदर व शिवरीकडे जाणाऱ्या टप्प्यात सुरू असून या अगोदर तीन वेळा या ठिकाणी आखणीत बदल करू शेतकऱ्यांना नोटीस देऊन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे
व आता पुन्हा एकदा वळती व शिंदवणे या गावांमध्ये या रिंग रोडच्या आखणीत बदल करण्यात आला असून आता पुन्हा मोजणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
या भागामध्ये भूसंपादनात बागायती आणि जिरायती जमिनीचे मूल्यांकनामध्ये फरक आहे व परत आता भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची याला मंजुरी असून देखील बदलत्या भूसंपादन धोरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.