स्पेशल

सातारा, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 1 एप्रिलपासून पुणे-सातारा महामार्गावरील प्रवास महागणार, ‘या’मुळे बसणार खिशाला कात्री

Pune-Satara Expressway : पुणे आणि साताराकरांसाठी एक मोठी माहिती हाती येत आहे. खरं पाहता शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि सातारा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. पुणे-सातारा महामार्गावरून हे प्रवासी प्रवास करत असतात. आता या प्रवाशांना हा प्रवास महागणार आहे.

कारण की, एक एप्रिल 2023 पासून सातारा-पुणे महामार्गावर असलेल्या खेड-शिवापुर टोलनाकाच्या टोल दरात वाढ होणार आहे. यामुळे निश्चितच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान, आज आपण या रोडवर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किती अधिक टोल भरावा लागू शकतो याबाबत सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा तपशीलवार प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- नांदेडच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू जमिनीवर सुरू केली पेरूची शेती; एकरी 120 टन उत्पादनाची साधली किमया, बनला लखपती

किती वाढणार टोल दर?

या महामार्गावरील खेड शिवापुर टोलनाक्याच्या टोल दरात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एक एप्रिल 2022 ला या टोल दरात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा म्हणजे नेट एक वर्षानंतर या दरात पाच टक्के वाढीचा निर्णय झाला आहे. एक एप्रिल 2023 पासून नवीन सुधारित टोल दर आकारले जाणार आहेत.

हे पण वाचा :- तुमचा सिबिल स्कोर चुकलाय का? तक्रार करायचीय का? मग ‘या’ ठिकाणी सादर करा तक्रार

सुधारित टोल दर वाहनानुसार खालीलप्रमाणे

एक एप्रिल 2023 पासून खेड शिवापूर टोलनाक्यावर चार चाकी व इतर व्यावसायिक वाहनाच्या टोल दरात वाढ करण्यात आली आहे. या नवीन सुधारित दरानुसार आता कार जीप आणि व्हॅन साठी 175 रुपये टोल लागणार आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी 280 रुपये टोल लागणार आहे, जड वाहनांसाठी 920 रुपये टोल लागेल तर मोठ्या वाहनांसाठी 1120 रुपये टोल आकारला जाणार आहे.

निश्चितच वाढत्या महागाईमुळे, इंधन दरवाढीमुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान आता टोल दरात वाढ झाली असल्याने प्रवास अजूनच मागणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना निश्चितच याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! अंगणवाडी भरतीला न्यायालयाची स्थगिती; पुन्हा होणार का भरती?, पहा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts