Pune Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सबंध महाराष्ट्राला नवीन दिशा दाखवण्याचे काम केलं आहे. पुण्यातील पुरंदर तालुका विशेषता तालुक्यातील दक्षिण पूर्व पट्टा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात कमी पाणी उपलब्ध असल्याने येथील शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करतात.
पाण्याचा कमी वापर करून येथील शेतकऱ्यांनी शेतीमधून चांगली कमाई करून दाखवली आहे. पुरंदर तालुक्यातील कर्नल वाडी येथील नवयुवक शेतकरी प्रवीण शिवाजीराव निगडे यांनी देखील कमी पाण्यावर येणाऱ्या कोथिंबीर पिकाची शेती करून लाखों रुपयांची कमाई करून दाखवली आहे. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने कोथिंबीर पिकासाठी फ्लड पद्धतीने पाणी न भरता तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिलं जातं.
हे पण वाचा :- शेतकऱ्याचा सूर्यफूल लागवडीचा प्रयोग ठरला फायदेशीर; 3 महिन्यात झाली 2 लाखांची कमाई
यामुळे पिकाची वाढही जोमदार होते आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासही मदत होते असं मत प्रवीण यांनी व्यक्त केलं आहे. केवळ कोथिंबीर पिकाचे प्रवीण शेती करतात असे नाही तर मेथी आणि कांदा पिकाचे देखील त्यांनी यशस्वी शेती केली आहे. या दोन्ही पिकांसाठी देखील त्यांनी तुषार सिंचन पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन केलं आहे.
प्रवीण सांगतात की तुषार सिंचन पद्धतीने पिकाला पाणी दिल्याने केवळ पाण्याची बचत होते असं नाही तर यामुळे पिकावर रोग अन किडींचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात जाणवतो. या पद्धतीने पिकाला पाणी दिल्यामुळे पिक धुवून निघत. विशेषता उन्हाळ्यात या पद्धतीने पाणी दिल्यास जमिनीतील तापमान नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत होते यामुळे पिकावर विपरीत परिणाम होत नाही. कोथिंबीर आणि मेथी साठी पिक निघेपर्यंत या तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिलं जातं.
हे पण वाचा :- काय सांगता ! केमिकल टाकले की बंद पडलेल्या बोअरलाही येते पाणी; सोलापूरच्या विशालच ‘विशाल’ संशोधन, गडकरींनीही थोपटली पाठ
कांद्याला मात्र सुरुवातीचे दोन महिने अशा पद्धतीने पाणी दिले जाते यानंतर कांद्याला अशा पद्धतीने पाणी देणे चुकीचे ठरते. त्यांनी याही वर्षी मेथी आणि कोथिंबीर पिकाची शेती सुरू केली आहे. त्यांच्या गावातील इतरही काही शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केली आहे.
ते सांगतात की पिकाला तुषार सिंचनच्या मदतीने पीक पेरणी केल्यानंतर सुरुवातीचे दहा ते बारा दिवस रोजाना अर्धा तास पाणी द्यावे लागते त्यानंतर एक दिवसाआड पाणी द्यावे. दरम्यान कोथिंबीरच्या अर्धा एकर क्षेत्रातून त्यांना एक लाखापर्यंतची कमाई होते. यंदा मात्र कोथिंबिरीला काय भाव मिळतो यावरच उत्पन्न अवलंबून राहणार आहे. तरी देखील त्यांना कोथिंबीर पिकातून चांगली कमाई होण्याची आशा आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गरवारे ते रुबी हॉल पर्यंतची मेट्रो ‘या’ तारखेला धावणार, मुहूर्त ठरला