Pune Vande Bharat Express : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. पुण्याला नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली होती. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय.
दरम्यान आता पुणेकरांना आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सध्या पुणे शहरातून तीन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी या मार्गावर ही गाडी सुरू आहे. शिवाय, मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्या मार्गे धावत आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास हा सुपरफास्ट झाला असून आगामी काळात पुणेकरांना आणखी काही वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत.
एक-दोन नाही तर तब्बल चार गाड्या मिळणार आहेत. हो पुणेकरांना आगामी काळात चार वंदे भारत एक्सप्रेस मिळतील अशा बातम्या सध्या प्रसार माध्यमांमध्ये पाहायला मिळताय.
कोणत्या मार्गांवर धावणार?
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे-सोलापुर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या वंदे भारत गाड्यांमुळे पुणेकरांचा रेल्वे प्रवास हा आधीच्या तुलनेत आणखी जलद आणि सुरक्षित झाला आहे. दरम्यान आता पुण्याला चार नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत.
पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. मात्र असे असले तरी अजून रेल्वे बोर्डाकडून याबाबत कोणतीच अपडेट हाती आलेली नाही.
कोणत्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करायची याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाकडूनच घेतला जात असतो. त्यामुळे रेल्वे बोर्ड सध्या चर्चेत असणाऱ्या या मार्गांवर खरंच वंदे भारत ट्रेन चालवणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.