Pune Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राला दोन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस ला 10 फेब्रुवारी पंतप्रधान महोदय यांनी हिरवा झेंडा दाखवला. निश्चितच या दोन वंदे भारत एक्सप्रेस मुळे महाराष्ट्राच्या राजधानीहुन पुणे, सोलापूर आणि साईनगरी शिर्डीचे अंतर हे जवळ होणार आहे. दरम्यान आता विद्याचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे ते शिक्षणाची पंढरी लातूर अशी एक वंदे भारत ट्रेन धावली पाहिजे अशी जनहिताची मागणी आमदार धीरज देशमुख यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
त्यामुळे लातूरवासीयांचा अगदी जिव्हाळ्याचा वंदे भारतचा विषय यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूरला देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे. हीच मागणी आमदार धीरज देशमुख यांनी केंद्र सरकार दरबारी मांडण्याचे कार्य केले आहे. केंद्र सरकारचे या वर्षीअखेर 75 वंदे भारत ट्रेन संपूर्ण देशात कार्यान्वित करण्याचे स्वप्न पाहता पुणे आणि लातूर दरम्यान खरच वंदे भारत एक्सप्रेस धावेल का हा मोठा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशात आतापर्यंत दहा वंदे भारत ट्रेन धावत आहेत. यामध्ये नव्याने रेल्वेच्या ताफ्यात सामील झालेल्या सीएसएमटी शिर्डी आणि सीएसएमटी सोलापूर वंदे भारतचा देखील समावेश आहे. वास्तविक महाराष्ट्र हे एक मात्र राज्य आहे ज्या ठिकाणी इंटरस्टेट वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
अशा परिस्थितीत महाराष्ट्राला अजून एक इंटरस्टेड वंदे भारत ट्रेन लाभणार का? हा प्रश्न धीरज देशमुख यांच्या मागणीनंतर चर्चीला जाऊ लागला आहे. पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर आणि लातूर म्हणजे शिक्षणाची पंढरी यामुळे या दोन्ही शहरांदरम्यान वंदे भारत ट्रेन लाभली तर विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे आमदार धीरज देशमुख यांनी या मागणी प्रसंगी मत व्यक्त केलं. मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डीच्या धरतीवर पुणे आणि लातूर दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस धावली पाहिजे असं देखील यावेळी देशमुख यांनी म्हटलं आहे.
Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर अन मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेषता, पहा सविस्तर