Pune Vande Bharat Railway News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याला लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. भारतीय रेल्वे पुणेकरांना आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट देणार अशी आशा आहे. खरं तर सध्या भारतात एकूण 65 वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून यापैकी 11 गाड्या आपल्या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. यातील बहुतांशी गाड्या मुंबईला मिळाल्या आहेत तर त्या पाठोपाठ नागपूर आणि पुण्याचा नंबर लागतो.
मुंबई बाबत बोलायचं झालं तर मुंबईहून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना आणि सीएसएमटी ते मडगाव या सहा मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि मुंबई येथील सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्या मार्गे सुरु आहे. उपराजधानी नागपूर येथून नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
दुसरीकडे, आता पुण्याला नवीन वर्षात एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार शोभा बच्छाव यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीत खासदार महोदयांनी धुळ्याला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळावी अशी मागणी केली.
त्यांनी धुळे ते पुणे आणि धुळे ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली गेली पाहिजे अशी आग्रही मागणी रेल्वेमंत्र्यांच्या या भेटीत उपस्थित केली आणि महत्त्वाचे म्हणजे नव्या वर्षात या मागणी संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन रेल्वेमंत्री महोदयांनी शोभा बच्छाव यांना दिलेले आहे.
यामुळे नवीन वर्षात मुंबई ते धुळे आणि पुणे ते धुळे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकतो असा मोठा दावा आता होऊ लागला आहे. मात्र असे असले तरी वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याबाबतचा अंतिम निर्णय हा रेल्वे बोर्डाचा असतो यामुळे रेल्वे बोर्ड खासदार शोभा बच्छाव या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
रेल्वेमंत्र्यांनी बच्छाव यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिलं आहे यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. जर पुणे ते धुळे आणि मुंबई ते धुळे या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर नक्कीच या शहरादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. यामुळे धुळ्यासहित संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील एकात्मिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास यावेळी तज्ञांनी व्यक्त केला आहे.