Pune Vande Bharat Sleeper Train : भारतीय रेल्वेने 2019 मध्ये वंदे भारत ट्रेन सुरु केली. ही ट्रेन सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला. यामुळे वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 65 वर पोहोचली.
यातील 11 गाड्या आपल्या महाराष्ट्रातुन धावत आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते इंदोर, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे देशातील ज्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे तेथे या गाडीला चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळत आहे. या गाडीमुळे सर्वसामान्यांचा प्रवास हा जलद, सुरक्षित आणि अगदीच आरामदायी झाला आहे. यामुळे या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या काळात सुरू झालेला हा वंदे भारत एक्सप्रेस चा प्रवास आता पुढे लांबला आहे. कारण की वंदे भारत मेट्रो ट्रेन देखील सुरू झाली आहे. भुज ते अहमदाबाद या मार्गावर ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे आता देशात लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू होणार आहे.
याच आगामी वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भात खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठी माहिती दिली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर प्रोटोटाईप ट्रेनने प्रवास करत ट्रेनची चाचणी केली होती.
यावेळी, या ट्रेनचा स्पीड, ट्रेनमधील सुविधांची माहिती देत त्यांनी ही ट्रेन कधीपर्यंत रुळावर येणार याबाबतही माहिती दिली होती. पुढील तीन महिन्यात देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार असे त्यांनी सांगितले होते.
अशातच आता, मुरलीधर मोहळ यांनी पहिली वंदे भारत स्लीपर कोणत्या मार्गावर धावणार याबाबत मोठे भाष्य केले आहे. मोहळ यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन ही पुण्याला मिळणार आहे.
ही ट्रेन पुणे ते दिल्ली रेल्वे मार्गावर धावणार अशी शक्यता सुद्धा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. खरे तर नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी पुण्याला पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळाली आहे.
याशिवाय मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन ही पुण्या मार्गे चालवली जाते. म्हणजेच पुण्याहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या आता 3 झाली आहे. दरम्यान आता देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही पुणे-दिल्ली रेल्वे मार्गावर चालवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.