स्पेशल

Punganur Cow: तुम्हाला माहिती आहे का पीएम मोदींना आवडणारी दुर्मिळ पुंगनूर प्रजातीची गाय? वाचाल किंमत आणि दुधाचा भाव तर फुटेल घाम

Punganur Cow:- भारतामध्ये अनेक प्रजातीच्या गायी असून त्यामध्ये बहुसंख्य गायी या देशी प्रजातीच्या आहेत आणि त्यामध्ये आता अनेक संकरित गाई देखील विकसित करण्यात आलेले आहेत.देशी गाईंमध्ये साहीवाल तसेच गीर इत्यादी गाई जितक्या प्रसिद्ध आहे तितक्या संकरित गाईंमध्ये होलस्टीन फ्रीजीएन, जर्सी तसेच त्रिवेणी सारख्या संकरित गाय प्रसिद्ध आहेत.

परंतु या व्यतिरिक्त जर आपण आंध्र प्रदेश राज्यातील पुंगनूर जातीच्या गाईचा विचार केला तर ही गाय व तिचे वैशिष्ट्य हे इतर गाईपेक्षा खूप वेगळ्या अशा आहे. दिल्लीत असलेल्या पीएम मोदी म्हणजेच पंतप्रधानांच्या निवासस्थाना बाहेर मकर संक्रांतीच्या सूर्यप्रकाशामध्ये पंतप्रधान मोदींना काही गाईंनी वेढलेले दिसून आले

व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या गाईंना चारा खाऊ घालत असून त्यांची काळजी घेत आहेत अशा पद्धतीचा व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला असेल. या व्हिडिओमध्ये ज्या काही बुटक्या म्हणजेच ठेंगण्या गाई होत्या त्याच गायी म्हणजे पुंगनूर गायी होय. याच गाईची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 नामशेष होत असलेल्या पुंगनूर जातींच्या गाईंचे संख्या वाढवण्यासाठी मिशन पुंगनूर

जर आपण इतर गाईंच्या तुलनेत या जातीच्या गाईचा विचार केला तर ही फक्त तीन लिटर दूध देते व त्यामुळे या गाईंचे पालन जास्त प्रमाणात केले जात नाही व त्यामुळे ही प्रजात धोक्यात आली. जर आपण याबाबत आंध्र प्रदेश पशुधन आणि दुग्ध विभागाचे माहिती पाहिली तर त्याच्यामते आंध्र प्रदेश राज्यात पुंगनूर गाईंची संख्या फक्त 2 हजार 772 इतकी आहे.

त्यामुळे या गाईंची संख्या वाढावी याकरिता काकीनाडा येथील डॉ. कृष्णम राजू यांनी यासंबंधी कामाला सुरुवात केली व 2019 मध्ये पुंगनूर गाईच्या बटक्या जातीचा शोध लावला व त्यांच्या प्रयत्नांना नंतर यश आले व सरकारच्या माध्यमातून 2020 मध्ये मिशन पुंगनूर सुरू करण्यात आले.

या मिशन अंतर्गत या गाईंची संख्या वाढावी याकरिता आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. एवढेच नाही तर याकरिता 69.36 कोटी रुपये देखील सरकारने मंजूर केले. याच प्रयत्नांचे फलित म्हणून आज आंध्र प्रदेश राज्यांमध्ये या गाईंची संख्या 13275 झाली आहे.

 पुंगनुर गाईच्या दुधाची किंमत हजार रुपये प्रति लिटर असते

याबाबत पशुवैद्यकीय तज्ञ म्हणतात की पुंगनूर गाय A2 श्रेणीचे दूध देते व या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जसे की हाय ब्लड प्रेशर तसेच त्वचा, संधिवात, रक्तदाब यासारखे अनेक रोग बरे किंवा त्यांना अटकाव करण्याची क्षमता या दुधात आहे. तसेच यामध्ये प्रथिन आणि कॅल्शियमचे प्रमाण देखील जास्त असते.

पुंगनूर गायीच्या A2 दुधामध्ये कॅसिन प्रोटीन आढळते व त्यामध्ये विटामिन ए, विटामिन डी, विटामिन बी 12, कॅल्शियम तसेच रायबोफ्लेवीन आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते व त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड देखील असते. या गायीच्या दुधाचा फॅट 8% पर्यंत आढळून येतो.

जर आपण पुंगनूर जातीच्या गायीच्या दुधाचा विचार केला तर ते प्रति लिटर तीनशे ते हजार रुपये दराने मिळते. तर या गाईच्या दुधापासून बनवलेले तुपाची किंमत ही दहा हजार ते पन्नास हजार रुपये प्रति किलो दरापर्यंत आहे. नाहीतर पुंगनूर जातीच्या गायीचे मूत्र हे अँटिबॅक्टरियल गुणधर्म असलेले असून आंध्र प्रदेश मधील शेतकरी पिकांवर फवारणीसाठी याचा वापर करतात.

या जातीच्या गाईचे मूत्र दहा रुपये लिटर आणि शेण पाच रुपये किलो दराने विकले जाते. तसेच या गाईचे वैशिष्ट्य पाहिले तर याची उंची 70 ते 90 सेंटीमीटर असते व वजन 115 ते 200 किलो पर्यंत असते. या गायची पाठ पुढून मागच्या बाजूने वाकलेली असते तर उंचीच्या तुलनेत शेपूट लांब असते व ती जमिनीला  स्पर्श करते. दररोज तीन ते पाच लिटर दूध देते व पाच किलो चारा दररोज लागतो. पुंगनूर प्रजातीच्या गाईची किंमत तीन ते वीस लाख रुपयांपर्यंत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts