स्पेशल

Punjab Dakh : अवकाळी पाऊस नाहीतर आता ‘या’मुळे नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार : पंजाब डख

Punjab Dakh Weather Report : राज्यातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. वास्तविक केल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होत होती. मात्र आता शेतकऱ्यांना अवकाळी पावसापासून आणि गारपीटी पासून दिलासा मिळणार आहे.

पंजाब डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार आता राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. 5 मे ते 7 मे दरम्यान मात्र राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे. हा पाऊस मात्र राज्यात सर्वदूर पडणार नसून तुरळक ठिकाणी पडणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काही कारण नाही.

मात्र 9 मे पासून महाराष्ट्रातील जनतेला थोडं सतर्क रहावे लागणार आहे. कारण की, 9 मे 2023 पासून राज्यात उन्हाचा पारा वाढणार आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे नऊ मे 2023 ते 16 मे 2023 पर्यंत राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तापमान जवळपास 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

एवढेच नाही तर काही ठिकाणी 45°c पेक्षा अधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. अर्थातच अधिक तापमानामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे. खरं पाहता नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एक मोठी दुःखद घटना घडली होती.

ती म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान अनेक नागरिकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. आता 9 मे ते 16 मे दरम्यान पुन्हा एकदा राज्यात उन्हामध्ये वाढ होणार आहे. तापमान जवळपास 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचणार आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना उन्हापासून स्वतःचे संरक्षण करायचे आहे.

दरम्यान अवकाळी पाऊस आता विश्रांती घेणार असल्याने शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वास्तविक गेल्या 2 महिन्यात म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण आता अवकाळी पाऊस विश्रांती घेणार असल्याने शेतकऱ्यांना आता खरीप हंगामासाठी अधिक जोमाने काम करता येणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts