Punjab National Bank FD Scheme : भारतात एकूण 12 सरकारी बँक आहेत. या बारा पब्लिक सेक्टर बँकांच्या यादीत पंजाब नॅशनल बँकेचा देखील समावेश होतो. पंजाब नॅशनल बँक अर्थातच पीएनबी आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. यासोबतच बँकेकडून एफडी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचा परतावा दिला जातोय. अलीकडे एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना देशातील प्रमुख सरकारी, खाजगी तसेच स्मॉल फायनान्स बँकांच्या माध्यमातून अधिकचा परतावा दिला जात असल्याने आता बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी बँकेच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करण्याला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे.
महिला वर्ग देखील आता मोठ्या प्रमाणात मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवत असल्याचे चित्र आहे. महिलांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक देखील सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि चांगल्या परताव्यासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवण्याला अधिक प्राधान्य देत आहेत.
अशा स्थितीत जर तुम्हीही आगामी काळात फिक्स डिपॉझिट योजनेत पैसे गुंतवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचा पर्याय हा परफेक्ट ठरणार आहे.
कारण की बँकेकडूनही आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगला परतावा दिला जातोय. दरम्यान आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या 300 दिवसांच्या एफडी योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाब नॅशनल बँकेची 300 दिवसांची एफडी योजना
पीएनबीची 300 दिवसांची एफडी योजना विशेष खास आहे. अल्पकालावधीतील गुंतवणुकीतून जर चांगला परतावा मिळवायचा असेल तर ही योजना सर्वोत्कृष्ट पर्याय ठरणार आहे. पीएनबी वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीवर वेगवेगळे व्याजदर ऑफर करत आहे.
ही देशातील प्रमुख सरकारी बँक असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 4.55 टक्क्यांपासून 7.30% पर्यंतचे व्याज ऑफर केले जात आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या 300 दिवसांच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 7.10% या दराने व्याज दिले जाते. याच एफडी योजनेत जर सीनियर सिटीजन ग्राहकाने गुंतवणूक केली तर त्यांना 7.60% या दराने व्याज दिले जाते.
7 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार
पीएनबीच्या 300 दिवसाच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकाने सात लाख रुपये गुंतवले तर त्यांना 7.10% या दराने मॅच्युरिटीवर म्हणजेच 300 दिवसानंतर सात लाख 49 हजार 700 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 49 हजार 700 रुपये निव्वळ रिटर्न मिळणार आहेत.
जर ज्येष्ठ नागरिक ग्राहकाने या योजनेत सात लाख गुंतवले तर त्यांना मॅच्युरिटीवर म्हणजेच 300 दिवसानंतर सात लाख 53 हजार दोनशे रुपये मिळणार आहेत. 53 हजार दोनशे रुपये हे व्याज स्वरूपात मिळणारे रिटर्न राहणार आहे.