Punjab National Bank FD Scheme : पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. सोबतच बँकेकडून फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील चांगले व्याज दिले जात आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील अनेक प्रमुख सरकारी, खाजगी आणि स्मॉल फायनान्स बँकांच्या माध्यमातून एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे.
दरम्यान जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचा पर्याय एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. कारण की ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देते.
अशा परिस्थितीत आज आपण ज्या बँकेच्या 25 महिन्यांच्या अर्थातच दोन वर्षे आणि एक महिन्याच्या एफडी योजनेबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे पंजाब नॅशनल बँकेची 25 महिन्यांची FD योजना?
PNB अर्थातच पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक 7 दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची FD ऑफर करत आहे. ही बँक वेगवेगळ्या कालावधीच्या FD साठी 3.5% पासून ते 7.25% दराने व्याज देत आहे.
या बँकेच्या 25 महिने कालावधीच्या एफडी बाबत बोलायचं झालं तर यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना बँकेकडून सात टक्के दराने आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे.
यानुसार जर या कालावधीच्या एफडी मध्ये सामान्य ग्राहकांनी दहा लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना 11 लाख 44 हजार 900 रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच सामान्य ग्राहकांना दहा लाख रुपये गुंतवल्यास एक लाख 44 हजार 900 रुपये एवढे व्याज मिळणार आहे. तसेच जर याच कालावधीत सीनियर सिटीजन ग्राहकांनी दहा लाख रुपये गुंतवले तर त्यांना 11 लाख 55 हजार 625 रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच एक लाख 55 हजार 625 रुपये एवढे रिटर्न मिळणार आहेत. अर्थातच या कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना अधिकचा परतावा मिळत आहे.