स्पेशल

पंजाब नॅशनल बँकेची FD योजना परवडणार ! 400 दिवसाच्या एफडी योजनेत 10 लाख रुपये गुंतवले तर इतके रिटर्न मिळणार

Punjab National Bank FD Scheme : पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. यासोबतच एफडी करणाऱ्यांना देखील बँकेकडून चांगला परतावा दिला जातोय.

अलीकडे बँकेच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात बँकेच्या फिक्स डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्हीही आगामी काळात बँकेच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

कारण की आज आपण पंजाब नॅशनल बँकेची 400 दिवसांची एफडी योजना नेमकी कशी आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पंजाब नॅशनल बँकेची चारशे दिवसांची एफडी योजना

पंजाब नॅशनल बँक ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी 400 दिवसांची एफ डी योजना ऑफर करते. या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.25% या रेटने परतावा दिला जातोय.

दुसरीकडे सीनियर सिटीजन ग्राहकांना यास एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.75 टक्के या रेटने परतावा मिळतोय. अर्थात सीनियर सिटीजन ग्राहकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50% अधिकचा व्याजदर लागू आहे.

यामुळे सामान्य ग्राहकांपेक्षा सीनियर सिटीजन ग्राहकांना पंजाब नॅशनल बँकेची एफडी योजना अधिक फायदेशीर ठरते. एवढेच नाही तर सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना तब्बल ८.०५% रेटने परतावा दिला जातोय.

दरम्यान आता आपण पंजाब नॅशनल बँकेच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेत जर एखाद्या ग्राहकाने दहा लाख रुपये गुंतवले तर त्याला किती रिटर्न मिळू शकतात याचे कॅल्क्युलेशन थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दहा लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?

पंजाब नॅशनल बँकेच्या 400 दिवसाच्या एफ डी स्कीम मध्ये जर दहा लाख रुपये गुंतवले तर सामान्य ग्राहकांना 7.25% या रेटने तर त्यांना दहा लाख 81,923 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 81 हजार 923 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

जर सुपर सीनियर सिटीजन ग्राहकाने या एफडी योजनेत 10 लाख रुपये गुंतवले तर त्यांना 8.05% या रेटने दहा लाख 91 हजार 271 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 91 हजार 271 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts