स्पेशल

‘पुष्पा 2’ नही झुकेगा! जगभरात केली धमाकेदार कमाई; दंगल आणि बाहुबली 2 नंतर कमाईच्या बाबतीत पोहोचला तिसऱ्या क्रमांकावर

Box Office Collection To Pushpa 2:- सध्या संपूर्ण देशातच नाही तर जगभरामध्ये साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2: द रुल सध्या मोठ्या प्रमाणावर कमाई करत असून त्याचा कमाईचा वेग सध्या तरी थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.

बॉक्स ऑफिसवर जर बघितले तर हा चित्रपट दररोज करोडो रुपयांची बंपर कमाई करताना दिसून येत आहे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे भारतातच नाही तर परदेशात देखील या चित्रपटाने अतिशय उत्तम प्रकारे असा व्यवसाय केला आहे व करत आहे.

विशेष म्हणजे पुष्पा 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम केला असून या चित्रपटाची संपूर्ण जगभरातील कमाई बघितली तर ती तब्बल 1500 कोटींच्या पुढे गेली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जगभरातील कमाईचे आकडे जाहीर केले आहेत

व पुष्पा 2 नावाच्या त्यांच्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवर एक पोस्ट करण्यात आली आहे व त्या पोस्टानुसार बघितले तर अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने जगभरात एक हजार पाचशे आठ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे आता या चित्रपटाचा प्रवास हा बाहुबली 2 च्या कमाईच्या बाबतीतला रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने सुरू आहे.

पुष्पा 2: द रुल हा ठरला सर्वाधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट
अल्लू अर्जुन स्टारर असलेला पुष्पा 2: द रुल हा तिसरा सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. याआधी आमिर खानचा दंगल हा 2000 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर बाहुबली 2 आहे.

या चित्रपटाने 1788 कोटींचा व्यवसाय केला होता.परंतु आता तिसरा क्रमांकावर अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 पोहचला असून त्याचा आता बाहुबली 2 चा विक्रम मोडण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे.

1000 कोटींच्या क्लबपासून आहे फक्त एक पाऊल दूर
पुष्पा 2: द रुल या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाईचा ओघ सुरू ठेवला आहे. आता हा चित्रपट 1000 कोटीची कमाई करण्यापासून फक्त काही पावले दूर आहे. जर मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर या चित्रपटाने पंधरा दिवसात 990.7 कोटी रुपये कमावले आहेत.

यामध्ये हिंदी भाषेत 621.6 कोटी रुपयांची कमाई केली तर तेलगूमध्ये 295.6 कोटी रुपये तर तामिळमध्ये 52.4 कोटी, कन्नडमध्ये 7.13 कोटी तर मल्याळम मध्ये 13.97 कोटींची कमाई केली आहे.

इतकेच नाही तर 2024 या वर्षांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा सुकुमार यांची असून यामध्ये रश्मिका मंदाना, फहाद फाजील व जगपती बाबू सारखे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts