Rabbi Jowar Farming : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये ज्यांनी अर्ली म्हणजेच आगात कापूस आणि सोयाबीन लागवड केली होती त्यांचे पीक परिपक्व झाले आहे. अनेक ठिकाणी कापसाची वेचणी सुरू झाली आहे आणि बहुतांशी भागांमध्ये सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू आहे.
येत्या काही दिवसांनी राज्यातील सोयाबीन आणि कापसाचे पीक पूर्णपणे हार्वेस्ट होणार आहे. याशिवाय खरिपातील इतरही अन्य महत्त्वाच्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. मका, बाजरी, उडीद अशा सर्वच पिकांची हार्वेस्टिंग सध्या स्थितीला केली जात असून येत्या काही दिवसांनी रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे.
यंदा मान्सून काळात राज्यात चांगला जोरदार पाऊस झाला आहे आणि यामुळे रब्बीमध्ये विविध पिकांचे लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे.
यासोबतच ज्वारीचे लागवडीखालील क्षेत्र देखील वाढणार असा अंदाज आहे. दरम्यान जर तुम्ही ही यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे.
कारण की आज आपण रब्बी ज्वारीच्या सुधारित 11 जातींची माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण ज्वारीची लागवड नेमकी कधी केली जाऊ शकते या संदर्भात माहिती पाहूया. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ज्वारीची पेरणी 15 सप्टेंबर पासून सुरू होते.
15 सप्टेंबर पासून पुढील एक महिना म्हणजेच 15 ऑक्टोबर पर्यंतचा काळ ज्वारी पेरणीसाठी अनुकूल असतो. मात्र जर तुम्हाला ज्वारीच्या पिकातून चांगले दर्जेदार अन विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर एक ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर हा जो 15 दिवसांचा कालावधी आहे या दिवसातच ज्वारीची पेरणी करणे आवश्यक आहे.
या काळात ज्वारीची पेरणी केली गेली तर त्याला वेळेवर पेरणी केली असे समजले जाते. दरम्यान आता आपण ज्वारीच्या सुधारित 11 जाती कोणत्या आहेत? हे जाणून घेऊया
ज्वारीच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
शेतकरी मित्रांनो जर तुमची भारी जमीन असेल तर तुम्ही रब्बी हंगामात फुले वसुधा, फुले यशोदा, पी के व्ही क्रांती, परभणी मोती या जातींची लागवड करू शकता. तसेच जर तुम्हाला भारी जमिनीत हायब्रीड वाणाची निवड करायची असेल तर तुम्ही CSH 15, CSH 19 या वाणांची सुद्धा निवड करू शकणार आहात.
जर तुमची जमीन हलकी असेल तर तुम्ही रब्बी हंगामात फुले अनुराधा, फुले माऊली, फुले यशोमती या वाणांची निवड करू शकता. जर तुमची जमीन ही मध्यम प्रकाराची असेल तर तुम्ही रब्बी हंगामात फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी 35-1 या जातींची निवड करू शकता.
कृषी तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शेतकरी बांधवांनी बागायती भागात ज्वारीची पेरणी करण्याचा निर्णय घेतलेला असेल तर त्यांनी फुले रेवती, फुले वसुधा, CSV-18, CSH-15 आणि CSH-19 या जातींची निवड करायला हवी.