स्पेशल

निर्णय झाला ! पुन्हा एकदा ना. राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगरचे पालकमंत्री होणार ? राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या संभाव्य पालकमंत्र्यांची यादी, पहा…

Radhakrishna Vikhe Patil News : महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आणि राज्यात फडणवीस सरकार आले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद पाहायला मिळाला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद दिले नसल्याने थोडे दिवस नाराज देखील होते. पण, त्यानंतर महायुतीने आपला CM पदाचा चेहरा जाहीर केला.

फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काही दिवस मंत्रिमंडळ विस्तारावर खलबत्त झाले अन अखेरकार मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहेत.

मात्र आता महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही घटक पक्षांच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांनी आता पालकमंत्री पदावरून अंतिम निर्णय घेतला आहे.

यामुळे लवकरचं कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी आपण संभाव्य पालकमंत्र्यांची नावे पाहणार आहोत. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या संभाव्य पालकमंत्र्यांची यादी आमच्या हाती आली असून आज आपण हीच यादी पाहणार आहोत.

राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेला आले असून या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. गेल्या वेळीही राधाकृष्ण विखे पाटील हेच नगरचे पालकमंत्री होते आणि यंदाही अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याचं पारड्यात पडण्याची दाट शक्यता आहे.

जिल्हानिहाय संभाव्य पालकमंत्र्यांची नावे

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे पाटील
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सांगली – शंभूराज देसाई
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ – संजय राठोड / भाजपाचा दावा देखील आहे
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अकोला – माणिकराव कोकाटे
अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा – राष्ट्रवादी अजित पवार
बुलढाणा – आकाश फुंडकर
चंद्रपूर – नरहरी झिरवळ
धाराशीव – धनंजय मुंडे
धुळे – जयकुमार रावल
गडचिरोली – एकनाथ शिंदे
गोंदिया – राष्ट्रवादी अजित पवार
हिंगोली – आशिष जैस्वाल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई शहर – योगेश कदम
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
नांदेड – भाजपाकडे राहिल
नंदुरबार – भाजपाचा दावा
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा कायम
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
वाशिम – माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक
जालना – अतुल सावे
लातूर – बाळासाहेब पाटील

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts