स्पेशल

‘मी तर तेव्हा सांगितलं होतं आधी आमदार तर व्हा आणि मग….’ राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा

Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ झालाय. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज देखील या निवडणुकीत पराभूत झालेत हे विशेष. सीएम पदाच्या शर्यतीत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला.

थोरात यांनी संगमनेरचे सलग आठ वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी 40 वर्ष संगमनेरची सत्ता आपल्या हातात ठेवली. मात्र यावेळी अमोल खताळ या नवख्या तरुणाने संगमनेर मधून मोठा उलटफेर करून दाखवला, त्यांनी थोरात यांना चितपट केले.

खताळ यांनी थोरात यांचा पराभव केला खरा, पण खताळ यांच्या विजया मागे दोन व्यक्तींचा हात होता. मावळत्या सरकारमधील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव, नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे माजी खा. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खताळ यांच्या विजयामध्ये मोलाची भूमिका निभावली.

विखे पाटील यांची रसद घेऊनच खताळ यांना संगमनेरचा किल्ला काबीज करता आला हे कुणापासून लपून राहिलेले नाही. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

खरे तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते आणि यावरूनच राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांना डिवचले आहे. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळ परिसरात राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी, अहिल्यानगर जिल्ह्यात काहीजण प्रस्थापित होते. त्यांच्या मतदारसंघात अनेकवर्ष काम करत असताना सर्वसामान्य माणसांचं त्यांनी शोषण केलं. त्यांनी लोकांची आडवणूक केली.

त्यामुळे केव्हातरी उद्रेक व्हायला पाहिजे होता तो झाला. नगर जिल्ह्यात एक परिवर्त झालं. हे परिवर्तन फक्त सुरुवात आहे, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील अशाच प्रकारचं चित्र दिसेल.

जेव्हा बाळासाहेब थोरातांचे त्यांच्या मतदारसंघात भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावले होते, तेव्हाच मी जाहीर सांगितलं होतं की पहिलं आमदार म्हणून निवडून या. आता त्या ठिकाणी जनतेनं आमोल खताळ यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिलाय, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांच्या भावी मुख्यमंत्रीच्या चर्चांवरून त्यांना डिवचले आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts