स्पेशल

राहुरीच्या भूमिपत्राने स्व-मालकीचे खरेदी केले हेलिकॉप्टर! पण गावाची ओढ….

Vijaykumar Sethi Story:- व्यक्ती कितीही आयुष्यामध्ये मोठा झाला किंवा कितीही कोट्यावधी रुपये तो आयुष्यामध्ये कमवायला लागला तरी त्याचे त्याच्या गावाशी व त्या गावाच्या मातीशी जे काही नाते असते किंवा जी नाड जोडलेली असते ती वेगळीच असते व ही गावाची माती व्यक्ती कुठेही असला आणि कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्याकडे खेचून आणतेच.

कारण गावाकडची माती आणि गावाकडची माणसं यांचे प्रत्येक व्यक्तीशी असलेले नाते हे शब्दात वर्णन करता येणार नाही अशा पद्धतीचे असते व म्हणूनच प्रत्येकाला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण राहिलो

तरी देखील गावाची आणि मातीची ओढ ही असते. याचाच काहीसा अनुभव अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र व पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या निमित्ताने आले.

राहुरी फॅक्टरीच्या भूमिपुत्राने खरेदी केले स्वतःचे हेलिकॉप्टर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र आणि सध्या पुणे येथे स्थित असलेले प्रसिद्ध उद्योजक विजयकुमार सेठी यांनी स्व-मालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केले व ते त्याला घेऊन राहुरी फॅक्टरी येथे दाखल झाले.

जेव्हा ते राहुरी फॅक्टरी येथे हेलिकॉप्टरने आले तेव्हा त्यांचा गावाकडील मित्रपरिवार व गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर जंगी स्वागत करण्यात आले.

विजयकुमार सेठी यांनी हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर मात्र गावाच्या ओढीने स्वस्थ बसू दिले नाही व ते थेट हेलिकॉप्टरने पुण्यावरून राहुरी फॅक्टरी या ठिकाणी आले व इतकेच नाही तर या हेलिकॉप्टरची विधिवत पूजा देखील त्यांनी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत केली.पुणे येथील एमवे व्हॅली येथून या हेलिकॉप्टरने टेकऑफ घेतले आणि राहुरी फॅक्टरी येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर अवघ्या 35 मिनिटात दाखल झाले.

हे हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड झाल्यानंतर महंत ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते या हेलिकॉप्टरचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी विजयकुमार सेठी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कीर्ती सेठी तसेच त्यांचे पुतणे बादल सेठी इत्यादी उपस्थित होते.

तसेच राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे, उद्योजक ऋषभ लोढा, साई आदर्श पतसंस्थेचे चेअरमन संगीता कपाळे व चेअरमन सुधाकर कदम, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, दि राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे व यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी राहुरी पोलीस ठाणे तसेच गृह रक्षक दल व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे जवान भारत साळुंखे व इतरांनी हेलिपॅड स्थळ याकरिता मदतकार्य केले. यावरून आपल्याला दिसून येते की व्यक्ती कितीही मोठी झाली तरी त्याला गावाकडची माती आणि गावाकडची माणसं यांची ओढ मात्र स्वस्थ बसू देत नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts