स्पेशल

सभापती प्रा. राम शिंदे यांचा महायुतीच्या वतीने जंगी सत्कार करू ! युवा आ. विक्रमसिंह पाचपुते यांची घोषणा

Ram Shinde News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती पदी निवड करण्यात आली. रामाभाऊ या सर्वोच्च पदावर पोहोचणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील चौथेच व्यक्ती ठरलेत. तसेच हा बहुमान पटकावणारे ते धनगर समाजातील कदाचित भारतातील पहिलेच व्यक्ती असावेत असे बोलले जात आहे.

म्हणूनचं कर्जत जामखेडचे भूमिपुत्र राम शिंदे यांचा नगर जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी सत्कार सोहळा आयोजित केला होता. काल शनिवारी अहिल्यानगर शहरातील माऊली सभागृहात राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा पार पडला.

या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. तर पोपटराव पवार, आ. सत्यजित तांबे, आ. हेमंत ओगले यांच्यासह अनेक नेते या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. पण जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत.

मग काय ही बातमी राज्यातील सर्वच प्रमुख वृत्तपत्रांची हेडलाईन बनली. रामाभाऊंच्या भव्य सत्कार सोहळ्याला त्यांच्याच पक्षातील आणि महायुती मधील अनेक नेत्यांनी दांडी मारली अन हा सर्वपक्षीय सत्कार सोहळा चर्चेत आला.

या सत्कार सोहळ्याला महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने पाहायला मिळाले. महायुतीचा एकही आमदार या सत्कार सोहळ्याला उपस्थित नव्हता पण महाविकास आघाडीचा एक आमदार या सत्कार सोहळ्यात दिसला अन म्हणून राज्याच्या राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण येणं स्वाभाविक होत.

पण आता याबाबत श्रीगोंद्याचे भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार विक्रमसिंह बबनदादा पाचपुते यांनी आणि राहुरीचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी प्रतिक्रिया देतांना असं म्हटलं की, शिर्डी येथे भाजपच्या होणाऱ्या महामेळाव्याच्या नियोजन बैठकीसाठी जावे लागल्याने शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला येता आलं नाही.

तर, भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी आपण खासगी घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी असल्याने सत्कार सोहळ्याला उपस्थित राहता आलं नाही असं सांगितलं. मात्र ही कसर भरून काढू आणि महायुतीच्या वतीने शिंदेंचा स्वतंत्र सत्कार सोहळा आयोजित केला जाईल असंही पाचपुते यांनी यावेळी जाहीर केलं.

ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले आणि युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आगडगाव येथे देवस्थान समितीच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले. आज रविवारी या दोन्ही नेत्यांची लाडूतुला करून त्यांचा सत्कार देवस्थान कडून करण्यात आला.

नगर, श्रीगोंदा आणि पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यावर असलेल्या या देवस्थानला सर्वच आमदारांचे नेहमीच सहकार्य असते अन म्हणून ही लाडूतुला करण्यात आल्याचे देवस्थान समितीने सांगितले. यावेळी युवा आमदार पाचपुते यांनी एवढ्या जागृत देवस्थानाकडून सन्मान होणं हे आमचं भाग्य असल्याचे म्हटले.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts