स्पेशल

Ratan Tata Death: रतन टाटा यांची धाडसाची कहाणी! कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी थेट भिडले गुंडांशी; नेमका काय होता प्रसंग? वाचा माहिती

Ratan Tata Death:- टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे भारताच्या उद्योग विश्वाचेच नाही तर एकंदरीतपणे सामाजिक दृष्टिकोनातून देखील कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

रतन टाटा हे नाव उद्योग विश्वापुरतेच मर्यादित न होते तर त्यांची समाजाविषयीची बांधिलकी देखील त्यांच्या अनेक कार्यावरून दिसून येते. मोठ्या प्रमाणावर समाजसेवी आणि तितकेच परोपकारी असलेले रतन टाटा नेहमी त्यांच्या कंपनी आणि कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल जागरूक होते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा भाग मानणारे ते एक विलक्षण असे उद्योजक होते. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर त्यांच्या आयुष्यातला एक घडलेला प्रसंग जर पाहिला तर आपल्याला याची अनुभूती येते.

एका मुलाखती दरम्यान रतन टाटा यांनी या घटनेचा उल्लेख केला होता तेव्हा त्यांनी म्हटले होते की, काही गुंडांना टाटा मोटरच्या व्यवसायाचे नुकसान करायचे होते व यातील एक गुंड टाटा मोटरच्या कर्मचाऱ्यांना नेहमी मारहाण  करायचा आणि त्यांना इजा करण्याची धमकी देत होता.

त्यामुळे काय करावे या विचारात असताना रतन टाटा यांनी स्वतः गुंडांना रोखण्याची जबाबदारी घेतली. असं त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते की टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच टाटा मोटर्स मध्ये हे प्रकरण घडले होते. कंपनीच्या प्लांटमध्ये काम बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती व साधारणपणे ही घटना 1980 या वर्षाची आहे.

 गुंडाने केला होता कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न

2015 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी मुलाखतीत या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम सांगितला होता व त्यांनी म्हटले होते की,एक गुंड त्यांच्या टाटा मोटर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असे व टाटा मोटरच्या कामांमध्ये अडचणी निर्माण करत होता.

विशेष म्हणजे या गुंडाचा प्रयत्न कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होता. तसेच वारंवार काम बंद करण्याची धमकी देखील देत होता व कर्मचाऱ्यांना मारहाण करायचा.

त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांनी या गुंडाच्या भीतीने  काम करणे बंद केले होते. गुंडाला टाटा मोटरची युनियन ताब्यात घ्यायची होती व कंपनीतील कर्मचाऱ्यांचा संप घडवून आणायचा होता. परंतु हे रतन टाटांना घडू द्यायचे नव्हते.

 रतन टाटांनी घेतला होता हा निर्णय

त्यानंतर या समस्येवर उपाय म्हणून रतन टाटा स्वतः टाटा मोटरर्सच्या प्लांट पर्यंत पोहोचले व तिथेच बरेच दिवस राहिले. कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले की मी तुमच्यासोबत आहे व काही घाबरण्याची गरज नाही.

अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले व पुन्हा काम सुरू करण्याला प्रवृत्त केले. नंतर रतन टाटा यांच्या प्रयत्नांमुळेच हा गुंड पकडला गेला प्लांटमध्ये पुन्हा काम पूर्ववत सुरू झाले.

अशा पद्धतीने धाडसाने त्यांनी पुढे येत स्वतः प्लांटमध्ये थांबून कर्मचाऱ्यांना धीर दिला व काम सुरू केले व या माध्यमातूनच टाटा कंपनी आणि कर्मचारी यांच्यातील मजबूत संबंधांची एक नवीन सुरुवात झाली.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts