स्पेशल

रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! 26 मे पर्यंत ‘हे’ काम करा, नाहीतर रेशन मिळणार नाही

Ration Card Maharashtra News : रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता शासनाकडून रेशन कार्डधारकांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून दिले जाते. कोरोना काळात तर गरीब जनतेला मोफत धान्य वितरणाचा कार्यक्रम शासनाने आखला होता.

विशेष म्हणजे अजूनही मोफत धान्य वितरण सुरूच आहे. मात्र आता काही रेशन कार्ड धारकांना स्वस्तात मिळणाऱ्या धान्यापासून मुकावे लागणार आहे.

हो बरोबर ऐकताय तुम्ही काही रेशन कार्ड धारकांचे धान्य बंद होऊ शकते. जर रेशन कार्ड लाभार्थ्यांनी आपल्या रेशनकार्ड सोबत आधार लिंक केले नाही तर अशा लाभार्थ्यांना या लाभापासून कायमचे वंचित ठेवले जाऊ शकते.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ! शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार; पण….

म्हणून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंतोदय आणि प्राधान्य कुटुंबामार्फत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या रेशन कार्ड सोबत लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करणे जरुरीचे आहे.

नाहीतर अशा लाभार्थ्यांना दरमहा मिळणाऱ्या शिधा लाभापासून वंचित रहावे लागू शकते. यामुळे शिधापत्रिकेला तत्काळ आधार लिंक करण्याचे आवाहन नासिक जिल्ह्यातील नांदगाव तहसिल कार्यालयाच्या मार्फत करण्यात आले आहे.

कार्यालयाच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांचे आधार सिडींग बाकी असेल त्यांनी येत्या दोन दिवसात म्हणजेच 26 मे 2023 पर्यंत कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड आणि रेशनकार्डची छायांकित प्रत धान्य दुकानदाराकडे जमा करावे आणि आपले आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करून घ्यावे असे आवाहन केले जात आहे.

हे पण वाचा :- शेवटी तारीख जाहीर झालीच; ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल, SMS करूनही पाहता येणार निकाल, वाचा….

यासोबतच मयत व्यक्ती किंवा विवाहित मुलीचे नाव रेशन कार्ड मधून कमी करण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी रेशन दुकानदाराकडे रेशनकार्ड मधून नाव कमी करण्याचा दाखला जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेशनकार्ड मधून मयत व्यक्तींचे किंवा विवाहित मुलीचे नाव स्वतःहून 31 मे 2023 पर्यंत लाभार्थ्यांनी कमी करून घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

रेशनिंगचा लाभ केवळ गरजू व्यक्तींना मिळावा यासाठी शासनाकडून रेशन योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे जाणकार लोकांकडून नमूद केले जात आहे.

हे पण वाचा :- खरं काय ! समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणेचा महत्त्वाचा टप्पा यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी ‘या’ महिन्यात होणार सूरू, वाचा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts