Ration Card News : देशभरातील गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सरकार सर्वसामान्य गरीब लोकांना स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून देते. सरकारकडून रास्त भावात रेशन उपलब्ध करून दिले जात आहे. कोरोना काळापासून तर केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य रेशन कार्डधारकांना मोफत रेशन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
अजूनही पात्र रेशन कार्डधारकांना मोफत रेशन मिळत आहेत. रेशन घेण्यासाठी नागरिकांकडे रेशन कार्ड असणे आवश्यक असते. महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्डचा उपयोग हा फक्त रेशन घेण्यासाठीच होतो असे नाही तर याचा वापर हा वेगवेगळ्या शासकीय योजनांमध्येही होतो. शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्ड लागते.
अशा परिस्थितीत जर तुम्ही नवीन रेशन कार्ड काढण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण घरबसल्या रेशन कार्ड कसे काढायचे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
घरबसल्या रेशन कार्ड साठी अर्ज कसा करायचा?
rcms.mahafood.gov.in या वेबसाईटवर रेशन कार्ड साठी अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर साईन इन / रजिस्टर या ऑप्शनवर जावं लागेल. या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला पब्लिक लॉगीन या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे.
त्यानंतर मग न्यू यूजर साईन अप हियर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आय वान्ट टू अप्लाय न्यू रेशन कार्ड या ऑप्शनला सिलेक्ट करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरायची आहे.
मग तुम्हाला कॅप्चा कोडं टाकायचा आहे. त्यानंतर मग गेट ओटीपी या ऑप्शनवर क्लीक करायचे आहे. ओटीपी टाकल्यानंतर सबमीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर तुमचे खाते उघडले जाईल.
त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉगिन करावे लागणार आहे. मग तुम्हाला अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड या ऑप्शनवर जायचे आहे. मग तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल तो भरायचा आहे. तसेच यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. जर समजा तुम्ही नव्या रेशनकार्डसाठी पात्र ठरलेत तर तुम्हाला तुमचे नवे रेशन कार्ड मिळून जाणार आहे.
कोणकोणते कागदपत्र लागणार ?
नवे रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड, मतदानकार्ड, किंवा पासपोर्ट
रहिवासी प्रमाणपत्र म्हणून वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, किंवा पासपोर्ट
कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
स्वघोषणापत्र
चौकशी अहवाल