Ration Card News : तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर, सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य, गरजवंत नागरिकांचा उद्धार करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो.
मात्र शासनाच्या या अशा असंख्य योजनांचा चुकीच्या पद्धतीने अपात्र लोकांकडूनही लाभ उचलला जात आहे. रेशन कार्ड धारकांना शासनाकडून स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते.
स्वस्त धान्य दुकानातून म्हणजेच रेशन दुकानातून हे अन्नधान्य गरिबांना वितरित केले जाते. पण, देशातील सर्वच पात्र रेशन कार्डधारकांना कोरोना काळापासून मोफत रेशन चा लाभ दिला जात आहे.
रेशनचा हा लाभ फक्त पात्र लोकांना दिला जात असतो. परंतु देशात असेही काही लोक आहेत जे अपात्र असतानाही रेशनचा लाभ घेत आहेत. दरम्यान आता सरकारकडून अशा अपात्र लोकांवर कारवाई केली जात आहे.
अशा अपात्र लोकांची ओळख पटवून त्यांच्यावर पुरवठा विभागाकडून कारवाई केली जात होत असून अशा लोकांना त्यांचे रेशन कार्ड सरेंडर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण रेशन साठी कोणते नागरिक अपात्र ठरतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
रेशन साठी कोण ठरते अपात्र ?
सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना रेशनचा लाभ मिळत नाही. ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे अशा लोकांना देखील रेशनचा लाभ दिला जाऊ शकत नाही.
आयकर भरणाऱ्या नागरिकांनाही रेशनचा लाभ दिला जात नाही. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा अधिक आहे अशा लोकांनाही रेशनचा लाभ दिला जाऊ शकत नाही.
शिवाय, आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनाही मोफत रेशनची सुविधा दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे जे लोक रेशन साठी पात्र नसतील त्यांनी त्यांचे रेशन कार्ड पुरवठा विभागाकडे जमा करावे असे आवाहन केले जात आहे.
पण, जे लोक अपात्र असूनही रेशनचा लाभ उचलतील त्यांच्याकडून अपात्र झालेल्या दिनांकापासून रेशनची रक्कम वसूल केली जाणार आहे. यामुळे लवकरात लवकर अशा अपात्र लोकांनी रेशन कार्ड सरेंडर करावे असे सांगितले गेले आहे.