स्पेशल

अरे बापरे ! ‘या’ लोकांना 1 ऑक्टोबरपासून रेशन मिळणार नाही, कारण काय ?

Ration Card News : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे काही रेशन कार्ड धारकांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ई-केवायसी न करणाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून रेशन मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत, ३० सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये धान्य मिळणार नाही. एवढेच नाही तर 31 ऑक्टोबर पर्यंत जे लोक ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून अशा व्यक्तींची नावे वगळली जाणार आहेत. म्हणजेच अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे. यामुळे जर तुम्हीही अजून पर्यंत ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रेशन मिळविण्यासाठी पात्र कुटुंबांसाठी, पीओएस मशीनद्वारे शिधापत्रिकेत नोंद केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी आवश्यक आहे. रेशन कार्ड मध्ये नाव असणाऱ्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी बायोमेट्रिक पडताळणीद्वारे करण्यासं सांगितले गेले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ई-केवायसी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश निर्गमित केल्यानंतर केंद्र सरकारने ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे.

जे लोक केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना रेशन दिले जाणार नाही आणि त्यांचे नाव रेशन कार्ड च्या यादी मधून वगळले जाणार आहे. म्हणजेच अन्नसुरक्षा योजनेतून अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड वगळले जाणार आहे. अन्नसुरक्षा योजनेत जर नाव नसेल तर रेशन कार्ड धारकांना सध्या जे मोफत अन्नधान्य मिळत आहे ते मिळणार नाही.

म्हणून सध्या राज्यात सर्वत्र रेशन दुकानात के वाय सी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. तथापि ज्या लोकांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घेणे आवश्यक आहे.

यासाठी संबंधितांच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना केवायसीच्या प्रक्रियेसाठी आवाहन करण्यात आले आहे. रेशन कार्ड ई-केवायसीसाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात आधार कार्ड घेऊन जावे लागणार आहे.

तुमची ई-केवायसी आधार कार्ड लिंक केल्यावरच पूर्ण होईल. रेशन कार्ड ई-केवायसीची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. जर कोणत्याही ग्राहकाचे बोटांचे ठसे उपलब्ध नसतील तर त्यांच्यासाठी आयरीस मशीन वापरून ई-केवायसी केले जाईल.

रेशनचा गहू मिळविण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत, 30 सप्टेंबरपूर्वी केवायसी करा, अन्यथा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासूनचं रेशनपासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच, 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी न केल्यास, वंचित निवडलेल्या लाभार्थ्यांची नावे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून काढून टाकली जातील.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts