RBI Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता त्यांना बँकिंग क्षेत्रात काम करायची इच्छा असेल अशांसाठी ही तर एक सुवर्णसंधीच राहणार आहे.
कारण की रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये काही रिक्त जागा भरती करण्यासाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. 9 मे 2023 रोजी याबाबतची सविस्तर अशी अधिसूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून निर्गमित करण्यात आली आहे.
त्यानुसार रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये जनरल, डीईपीआर आणि डीएसआयएम विभागांमध्ये ग्रेड बी स्तरावरील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी आरबीआय कडून अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- ठरलं ! महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या वाढणार; तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जाणार? नवीन जिल्ह्याची यादी, पहा…
दरम्यान आज आपण किती रिक्त पदांसाठी भरती होणार आहे, कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय, यासाठी अर्ज कसा करता येईल तसेच यासाठी किती मुदत आहे? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी होणार भरती?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, जनरल विभागात ग्रेड बी अधिकाऱ्यांची 222 रिक्त पदे, डीईपीआर ग्रेड बी अधिकाऱ्यांची 38 आणि डीएसआयएम मधील ग्रेड बी अधिकाऱ्यांची 31 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस पाठोपाठ आता देशात वंदे भारत इलेक्ट्रॉनिक व्हेईकलही धावणार सुसाट; किंमत अन विशेषता आहेत खूपच खास, पहा….
आवश्यक शैक्षणिक पात्रता काय?
किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेले उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत. तसेच पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतले उमेदवार देखील यासाठी पात्र राहणार आहेत. मात्र मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून पदवी ग्रहण केलेली असणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक
यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 9 जून 2023 पूर्वी आपला अर्ज सादर करायचा आहे. 9 जून अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक आहे. यामुळे इच्छुक व्यक्तींनी आपला अर्ज विहित कालावधीच्या आत सादर करणे जरुरीचे आहे.
हे पण वाचा :- पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार? ‘या’ 8 तालुक्याचा तयार होणार नवीन शिवनेरी जिल्हा, तालुक्याची आणि गावांची यादी पहा एका क्लिकवर