जगाचा विचार केला तर अशा अनेक गोष्टी आहेत की त्या अनेक अर्थांनी खूप चमत्कारिक असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच अशा गोष्टींविषयी जर आपण काही विचार केला तर त्या गोष्टींची उत्पत्ती किंवा त्या गोष्टींचा अस्तित्व इत्यादी बद्दल असलेल्या प्रश्नाचे उत्तरे देखील सापडत नाहीत.
असाच एक प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना कित्येक वर्षापासून पडलेला आहे आणि तो म्हणजे कोंबडी आणि अंड्या बद्दल. बरेचदा आपण ऐकलं असेल किंवा वाचलं असेल किंवा आपल्याला कोणी विचारला असेल की या जगामध्ये कोंबडी अगोदर आली की अंडे? खरंच या प्रश्नाचे उत्तर देणे खूप कठीण असे काम आहे.
कारण आपल्याला माहित आहे की कोंबडीचा जन्म होतो तो अंड्यातून. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर अंड्याची निर्मिती ही कोंबडी पासून होते. त्यामुळे विचारशक्ती सुद्धा सुन्न होते की कोंबडी पहिली आली की अंडे. परंतु जगाला पडलेला या प्रश्नाचे उत्तर आता संशोधकांना सापडले असून जगाला पडलेल्या या गहण प्रश्नाचे उत्तर सापडले असेच म्हणावे लागेल.
वाचा काय म्हणतं शास्त्रज्ञांचे संशोधन?
अंडे अगोदर आले की कोंबडी याबाबत जो काही प्रश्न पडतो या प्रश्नाचे उत्तर ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका संशोधनातून शोधून काढले आहे. त्यामुळे आता जगाला पडणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर सापडले असेच आपल्याला म्हणावे लागेल. केलेल्या संशोधनाच्या आधारावर शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की जगात सर्वप्रथम अंडे आलेच नव्हते.
तर सर्वात आधी कोंबडी किंवा कोंबडाच या पृथ्वीतलावर आल्या होत्या.जर आपण या संशोधनुसार पाहिले तर कित्येक हजार वर्षांपूर्वी कोंबडी किंवा कोंबडा आजमीतिला जसे दिसतात तसे ते दिसतच नव्हते असे त्यांनी स्पष्ट केल आहे. कोंबडी अगोदर अंडी देत नव्हती तर ती पिलांना जन्म देत होती. म्हणजेच आता जसे अंड्यातून पिल्लं जन्म घेतात
त्याप्रमाणे अगोदर कोंबडी पिल्लांना जन्म देताना अंड्यातून नव्हे तर अंड्या विनाच पिल्लांना जन्म देत होती असे या संशोधनातून समोर आले आहे. त्यानंतर काळ बदलत गेला तसेच भौगोलिक रचना देखील बदलल्या व प्राणी तसेच पक्षांच्या शरीर रचनेमध्ये देखील मोठे बदल होत गेले.
नंतर कालांतराने कोंबड्यांच्या प्रजनन प्रक्रियेमध्ये देखील बदल झाला व डायरेक्ट पिलांना जन्म न देता त्यांच्यात अंडे देण्याची क्षमता शरीरामध्ये विकसित झाली. यावरून अखेर जगामध्ये कोंबडा किंवा कोंबडीच आधी आली हे सिद्ध होते. शास्त्रज्ञांनी कोंबड्यांच्या प्रजनन क्षमतेमध्ये असणाऱ्या या भिन्नतेला एक्सटेंडेड एम्ब्रयो रिटेन्शन असे नाव दिले.
यामध्ये जे काही निरीक्षण करण्यात आले त्यामधून मिळालेल्या माहितीनुसार अनेकदा प्राण्यांनी अंड दिल्यानंतर त्यात भ्रूण विकसित होते. तर यामध्ये काही भ्रूण अंड देतात तेव्हाच ते विकसित झालेले असते. या सगळ्या संशोधनावरून आता सिद्ध झाले आहे की पृथ्वीतलावर अगोदर अंडे नव्हे तर कोंबड्याच आल्या आहेत.