स्पेशल

पंजाब डख कशाची शेती करतात ? शेतातून किती उत्पन्न काढतात ? असे आहे हवामान अंदाज खरा ठरण्यामागील गुपित…

गेल्या दोन ते तीन वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रातील सर्व विभागातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव डख हे नाव खूप प्रसिद्ध असून बहुतांशी शेतकरी त्यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार शेतीचे कामाचे नियोजन करतात. त्यामुळे उभ्या महाराष्ट्राला ते आता परिचित आहेत. परंतु आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजा व्यतिरिक्त त्यांचे व्यक्तिगत आयुष्य तसेच हवामान अंदाज वर्तवण्या मागची त्यांची गृहितके माहित नाहीत. त्यामुळे आपण या लेखांमध्ये पंजाबराव नेमके कोण आहेत? त्यांचे शिक्षण इत्यादिबाबत महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

 पंजाबरावांची वैयक्तिक माहिती

पंजाबराव डख हे गुगळी, धामणगाव जिल्हा परभणी येथील रहिवासी असून  ते सध्या हवामान अंदाज

क म्हणून काम करत आहेत.त्यांचे शिक्षण सीटीसी, ईटीएस झालेले असून ते स्वतः प्रगतीशील शेतकरी देखील आहेत.  त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून अगदी लहानपणापासून घरात शेतीचे वातावरण असल्यामुळे ते त्यांच्या वडिलांसोबत टीव्हीवर नेहमी हवामान अंदाज ऐकत असत व ती सवय त्यांना कायम लागली.

या अंदाजानवर ते त्यांच्या वडिलांसोबत देखील चर्चा करत. या पार्श्वभूमीवर ते टीव्हीवर वर्तवण्यात आलेला हवामानाचा अंदाज  आणि त्यांचा स्वतःचा हवामानाचा अंदाज याची ती तुलना करून पहात व निरीक्षण करत असत. आजूबाजूला होणारा हवामानातील बदल  आणि त्यांनी वर्तवलेला हवामानाचा अंदाज यामध्ये बारकाइने निरीक्षण करून नोंद ठेवत असत. बऱ्याचदा लहानपणी त्यांनी केलेली निरीक्षण हे बरोबर ठरत असत.

ते व्यवसायाने शेतकरी आहेतच व त्यासोबतच ते त्यांच्या गावातील शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून देखील काम करतात.  लहानपणापासून हवामानाचा अंदाज वर्तवण्याची त्यांची आवडीमुळे त्यात ते कार्यरत झाले व सध्या त्यांनी निसर्गाचे निरीक्षण आणि दस्तऐवजी करण, संगणक, सॅटॅलाइट आणि नकाशे यांचा वापर करून यामध्ये फारसे विकसित केले असून त्यांनी सिडॅक मध्ये एक अभ्यासक्रम देखील पूर्ण केलेला आहे.या सगळ्या बाबींमुळेच हवामान अंदाज वर्तवण्यात आवश्यक असलेल्या त्यांच्या ज्ञानामध्ये देखील आता भर पडण्यास मदत झाली आहे.

 पंजाबराव यांच्या शेतीबद्दल

माहिती

पंजाबराव हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांच्याकडे दहा एकर जमीन आहे. संपूर्णपणे आधुनिक पद्धतीने शेती करतात. या शेतीमध्ये ते हंगामानुसार हरभरा तसेच सोयाबीन इत्यादी पिके घेतात. स्वतः त्यांचा हवामानाचा व शेतीचा अचूक योग्य अंदाज त्यांना असल्यामुळे ते शेतीतून देखील चांगले उत्पन्न घेतात. साधारणपणे वर्षाला ते सोयाबीन आणि हरभरा मिळून 200 क्विंटल इतका शेतीमाल पिकवतात. यावरून अंदाज बांधला तर जवळपास सहा ते आठ लाखांचे वार्षिक उत्पन्न ते शेतीतून मिळतात.

 पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरण्यामागील गुपित

जर आपण गेल्या काही वर्षाचा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला अंदाज याचा विचार केला तर बहुतांशी तो चुकताना दिसतो. त्यामुळे हवामान विभागाविषयी शेतकऱ्यांमध्ये असलेली विश्वासार्हता कमी झाली. याच कालावधीमध्ये पंजाबराव यांचे अंदाज बहुतांशी खरे ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले.

साधारणपणे पंजाबरावांची हवामान अंदाज वर्तवण्यामागेचे गुपित पाहिले तर ते शास्त्रशुद्ध व सखोल निसर्गाचे निरीक्षण करून हवामानाचा अंदाज देत असतात. शेतकऱ्यांपर्यंत त्यांचा अचूक हवामान अंदाज मिळावा याकरिता त्यांनी महाराष्ट्रभर मोठ्या संख्येने व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ते त्यांचा हवामानाविषयीचा अंदाज पोहोचवतात. एवढेच नाही तर त्यांचे स्वतःचे यूट्यूब चैनल देखील असून  या चॅनलच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज पोहोचवतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts