अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून येऊ घातलेल्या सणासुदीच्या कालावधीमध्ये उत्तम वैशिष्ट्य असलेले धमाकेदार असे स्मार्टफोन कमीत कमी किमतीमध्ये लॉन्च केले जात असून ग्राहकांना आता अनेक कमी किमतीतले बजेट मधील फोन खरेदी करण्यासाठीचे पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
याच अनुषंगाने जर आपण बघितले तर रियलमीने देखील आपल्या सी सिरीज मधील रियलमी C63 5G स्मार्टफोन लॉन्च केला असून हा फोन खूप कमीत कमी किमतीत ग्राहकांना मिळणार आहे. हा फोन ग्रीन आणि स्टाररी गोल्ड या दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. याच स्मार्टफोनची माहिती आपण या लेखात बघू.
रियलमीने लॉन्च केला Realmi C63 5G स्मार्टफोन
रियलमीचा हा फोन चार जीबी, सहा आणि आठ जीबी LPDDR4x रॅमसह येतो व हा फोन 128 जीबी स्टोरेजसह आणला गेला आहे. तसेच या स्मार्टफोनचे स्टोरेज मायक्रो एसडी कार्डसह 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते.
तसेच या नवीन लॉन्च केलेल्या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच,1604×720 पिक्सेल रिझोल्युशन, एचडी+ स्क्रीन,240Hz टच सॅम्पलींग रेट आणि 625 nits पीक ब्राईटनेससह येतो.
कसा आहे या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा?
रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये गॅलेक्सी कोअर GC32E1 सेन्सर आणि एलईडी फ्लॅशसह 32 मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आलेला असून हा फोन आठ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरासह येतो.
कशी आहे बॅटरी?
रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी दिली असून ती 10W क्विक चार्जला सपोर्ट करते. यासोबतच हा फोन अँड्रॉइड 14 वर realme UI 5.0 सह चालतो तसेच यामध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक,1115 अल्ट्रा लिनियर बॉटम पोर्टेड स्पीकर, ब्लूटूथ 5.3 आणि माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.
किती आहे या फोनची किंमत?
रियलमी C63 5G स्मार्टफोन दहा हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आलेला आहे. तसेच व्हेरियंटनुसार किंमत पाहिली तर…
1- चार जीबी रॅम+ 128 जीबी व्हेरियंटची किंमत दहा हजार 999 रुपये आहे.
2- सहा जीबी+ 128 जीबी व्हेरीएंटची किंमत 11999 रुपये आहे.
3- आठ जीबी+ 128 जीबी व्हेरियंटची किंमत 12999 रुपये आहे.
तुम्ही हा फोन 1000 रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदी करू शकतात व डिस्काउंट नंतर हा फोन 9999 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येऊ शकतो.
या स्मार्टफोनची पहिली विक्री 20 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू होईल व हा फोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर खरेदी करता येणार आहे.