Rose Farming : गेल्या काही दशकांपासून पारंपारिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत शेतकरी सांगतात की, गेल्या काही वर्षांपासून इंधनाच्या दरात वाढ झाली असल्याने कृषी निविष्ठांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत.
कृषी निविष्ठांच्या किमती वाढल्या आहेत शिवाय वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. यामुळे आता पिक उत्पादित करण्यासाठी येणाऱ्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, आता शेतीमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे अनेकांनी शेतीमध्ये बदल करत आता पारंपारिक पिक पद्धतीला बगल देत नवनवीन नगदी पिकांची शेती सुरू केली आहे. यामध्ये फळबागांची लागवड वाढली आहे. याव्यतिरिक्त फुलांची शेती देखील राज्यात वाढली आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, सर्पदंश झाला तर घाबरू नका, ‘हे’ काम करा; पण सापाने चावा घेतल्यास ‘या’ गोष्टी करणे टाळा, नाहीतर….
फुलशेतीच्या माध्यमातून शेतकरी बांधव चांगली कमाई करू लागले आहेत. दरम्यान लातूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्यानेही गुलाब फुलाच्या लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. बाबुराव शामराव सुरवसे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.
बाबुराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित नऊ एकरात गुलाब शेतीचा प्रयोग केला आहे. आता त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून गुलाब शेतीच्या माध्यमातून त्यांना लाखोंची कमाई होत आहे. बाबुराव सांगतात की, कमी जमीन, कमी पाणी तसेच कमी मेहनतीत गुलाब लागवडीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
हे पण वाचा :- धक्कादायक ! महाराष्ट्र पुन्हा हादरला; पाच महिन्यातील शेतकरी आत्महत्येची ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी, शासन केव्हा जाग होणार?
यामुळे त्यांनी गुलाब शेतीत आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित नऊ एकर जमिनीत गुलाबाची शेती सुरू केली. आता गुलाब शेतीमधून त्यांना उत्पन्न मिळू लागले आहे. गुलाब शेती मधून त्यांना बारामाही उत्पन्न मिळत असून वर्षाकाठी जवळपास साडेतीन लाखांची कमाई त्यांना होत आहे.
विशेष म्हणजे यासाठी त्यांनी केवळ 35 हजार रुपयांचा खर्च केला आहे. अर्थातच कमी खर्चात त्यांना या पिकाच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. यामुळे ते शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करत फुल शेती करण्याचा सल्ला देत आहेत. निश्चितच बाबुराव यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यात ‘या’ वेळी पडणार जोरदार पाऊस ! पंजाब डख यांनी तारीखच सांगितली