स्पेशल

गॅस सिलेंडर, महागाई भत्ता, आधार कार्डबाबत मोठी अपडेट ! सप्टेंबर महिन्यात होणार ‘हे’ 4 मोठे बदल; सर्वसामान्यांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या…..

Rule Change In September : लवकरच ऑगस्ट महिन्याची सांगता होणार आहे. ऑगस्ट महिन्याचे फक्त सात दिवस शिल्लक राहिले असून अशातच सर्वसामान्य नागरिकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक मोठमोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या नवीन बदलांमुळे काही लोकांना दिलासा मिळणार आहे तर काही लोकांचे बजेट कोलमडू शकते.

म्हणजेच या नवीन बदलांचा परिणाम हा तुमच्या खिशावर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडर, आधार कार्ड आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये बदल होणार आहे. दरम्यान आता आपण पुढील महिन्यात कोणकोणते बदल होणार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

महागाई भत्ता : सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून दरवर्षी महागाई भत्ता चेंज होत असतो. यानुसार, जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता मार्च महिन्यात बदलला गेला आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. याचा रोख लाभ मार्च महिन्यापासून दिला जात आहे.

आता पुढील महिन्यात महागाई भत्ता 53% केला जाणार अशी शक्यता आहे. हा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून सुधारित केला जाणार आहे. याचा निर्णय पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये होईल आणि सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे. अर्थातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के होणार आहे.

गॅस सिलेंडर : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किमती बदलत असतात. काही वेळा किमती वाढतात तर काही वेळा किमतीमध्ये घसरण होत असते. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या अर्थातच 14.2kg गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झालेला नाही.

मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झालेला आहे. दरम्यान पुढील महिन्यात कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो अशी शक्यता आहे.

जुलै महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 30 रुपयांनी कमी झाल्या होत्या. ऑगस्ट महिन्यात या किमती 8.50 रुपयांनी वाढल्या होत्या. आता पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये या किमती कमी होतात की वाढतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

आधार कार्ड अपडेट : ज्या लोकांचे आधार कार्ड दहा वर्षे जुन आहे त्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे आधार कार्ड माय आधार पोर्टलवर विनाशुल्क अपडेट करून दिले जात आहे. आधी 14 जून 2024 पर्यंत विनाशुल्क आधार कार्ड अपडेट करून दिले जाणार होते.

मात्र 14 जून पर्यंत अनेकांचे आधार कार्ड अपडेट करणे बाकी होते. यामुळे सरकारने ही मुदत 14 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. अर्थातच 14 सप्टेंबर पर्यंत आता नागरिकांना माय आधार पोर्टल वर जाऊन विनाशूल्क आधार अपडेट करता येणार आहे. 14 सप्टेंबर नंतर मात्र आधार अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

एटीएफ आणि सीएनजी-पीएनजीचे दर : एलपीजी सिलिंडरच्या किंमती प्रत्येक महिन्याला बदलत असतात. तसेच एयर टर्बाइन फ्यूल आणि सीएनजी, पीएनजीच्या दरात सुद्धा प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बदल होत असतो. पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये ही याच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेला एटीएफ आणि सीएनजी-पीएनजीचे दर एकतर कमी होतील किंवा वाढतील.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts