Salmon Fish Farming:- बरेच व्यक्ती हे मांसाहारी असतात व बऱ्याच व्यक्तींना सीफूड खायला आवडते. यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे मासे खायला बऱ्याच व्यक्तींना आवडत असते व आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात. जर आपण माशांचे प्रकार पाहिले तर ते अनेक प्रकारचे आहेत परंतु यामध्ये जर आपण सॅल्मोन या जातीच्या माशाचा विचार केला तर तो सर्वोत्तम असा मानला जातो.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील हा मासा खूप फायदेशीर असून हा गोड्या आणि खाऱ्या पाण्यात राहणारा मासा आहे व याला मराठीमध्ये रावस मासा असे म्हणतात.सॅल्मन हे एक रंगाचे नाव असून गुलाबी केशरी किंवा फिकट गुलाबी असा पद्धतीचा हा रंग असतो. या माशाचा रंग देखील सॅल्मन रंगासारखाच असतो म्हणून त्याला हे नाव देण्यात आलेले आहे. सॅल्मन माशाचा वरचा पृष्ठभाग चांदीसारखा दिसतो परंतु जेव्हा त्याची त्वचा स्वच्छ केली जाते तेव्हा ती केशरी रंगाची असते.
या जातीचे मासे अंडी घालण्याकरिता गोड्या पाण्याकडे येतात. या माशाचे जास्तीत जास्त वजन 57.4 किलो आणि लांबी दीड मीटर पर्यंत असू शकते. हा मासा प्रोटीनचा समृद्ध स्त्रोत मानला जातो व त्यासोबतच ओमेगा तीन फॅटी ऍसिड, अँटी इम्प्लेमेंटरी, विटामिन बी 3, बी 1, बी 12, सेलेनियम, ऑंटी डायबेटीक, अँटिऑक्सिडंट इत्यादी घटक असतात. हा मासा स्मरणशक्तीसाठी देखील खूप चांगला मानला जातो व रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी देखील हा फायद्याचा आहे. परंतु या माशाचे पालन शेतकऱ्यांना करता येऊ शकते का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. याबद्दलच आपण या लेखात माहिती घेऊ.
सॅल्मन जातीच्या माशाबद्दल माहिती
जर आपण बाजारपेठेतील या जातीच्या माशाचे दर पाहिले तर ते चांगल्या पद्धतीचे दर असून या माशाची साईज देखील चांगली असते. तसेच याचे पालन करणे देखील सोपे आहे असे मानले जाते. जर आपण या जातीच्या माशाचा विचार केला तर भारतापेक्षा पूर्वकडील देशांमध्ये या माशाची क्रेझ जास्त पाहायला मिळते. आपल्याकडे देखील या माशाची क्रेझ आहे परंतु अस्सल सॅल्मन मिळणे जरा कठीण आहे.
आपल्याकडे याच्यातीलच मराठीत रावस मासा म्हटला जातो तो मिळतो. परंतु जर आपण अस्सल सॅल्मन जातीच्या माशाचा विचार केला तर तो प्रामुख्याने पूर्वेकडील देशांमध्ये मिळतो व त्या ठिकाणी या माशाचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्या ठिकाणी या जातीच्या माशाचे पालन करण्याकरिता ते हॅचरीज तयार करतात व या जातीच्या माशांचे पिल्ले तयार करतात व त्यांना नंतर त्या पिलांना समुद्रात सोडले जाते व हे लहान पिल्ले मोठे झाल्यानंतर त्यांना मासेमारीच्या साह्याने पकडले जाते. याकरिता त्यांनी विशिष्ट असा परिसरामध्ये बाउंड्रीज अर्थात सीमा तयार केलेले आहेत व या अंतर्गतच या माशाच्या पिल्लांना सोडले जाते.
परंतु जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये सॅल्मन जातीच्या माशाच्या पालनाबद्दल कुठपर्यंत काम करण्यात आले आहे? तर आंध्र प्रदेश राज्यात काही नवीन बिझनेस मॅन, तसेच काही शेतकरी या माशाच्या पालनावर प्रयोग करत आहेत. परंतु आपल्याकडे या जातीच्या माशाचे पालन यशस्वी होईल की नाही याबद्दल अजून काहीही सांगता येत नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे जर तुम्हाला या जातीच्या माशाचे पालन करायचे असेल व चांगले वजन मिळवायचे असेल तर याकरिता तुम्हाला लागेल एक तर समुद्राचे पाणी.
परंतु बरेच लोक म्हणतात की आम्ही खाऱ्या पाण्याची व्यवस्था करू परंतु जर समुद्राच्या तापमानाचा विचार केला तर ते चार अंश डिग्री ते 15 अंश डिग्री सेल्सिअस च्या दरम्यान कमी जास्त होत राहते व या पद्धतीचे तापमान आपल्याला मेंटेन करणे अवघड आहे. तसेच हा मासा प्रामुख्याने समुद्रात राहणारा आणि वाढणारा मासा आहे. आपण कायदेशीर दृष्ट्या विचार केला तर या जातीच्या माशाचे पालन हे वैध आहे.
आंध्रप्रदेश राज्यातील काही शेतकरी या जातीच्या माशाचे पालन देखील करत आहेत. त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे या जातीच्या माशाच्या पालनात न पडता व्यवस्थित या माशाच्या पालनाबद्दल संशोधन झाल्यानंतर योग्य रीतीने जेव्हा माहिती होईल की या माशाचे पालन आपल्याकडे यशस्वी होऊ शकते तेव्हाच सॅल्मन जातीच्या माशाचे पालन करणे योग्य ठरेल.
आंध्रप्रदेश मधील एका शेतकऱ्याने दोन पिंजऱ्यांमध्ये या जातीच्या माशाचे पालन सुरू केले आहे व या दोन पिंजऱ्यांमध्ये दोन हजार माशांचे पालन केले जात आहे. या शेतकऱ्याचा काय निकाल येतो किंवा काय परिणाम पाहायला मिळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे सध्या तरी सॅल्मन जातीच्या माशाचे पालन करण्याचा विचार न केलेला बरा.