Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार होत असून राज्य शासनाचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
या प्रकल्पामुळे विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. म्हणून वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील विदर्भातील एक प्रमुख नेते आहेत.
यामुळे फडणवीस यांचे या प्रकल्पाकडे कायमच लक्ष राहिले आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा या अनुषंगाने त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांमुळे या प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी (520 किलोमीटर) हा वाहतुकीसाठी गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये खुला करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. दरम्यान या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत नाशिकमधील पिंपरी सदो आणि ठाण्यातील वाशाळा बुद्रुकला जोडणारे 13.1 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम म्हणजे या मार्गाच्या पॅकेज 14 मधील काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.
या पॅकेजचे काम अफकोन्स कंपनीकडून केले जात आहे. या पॅकेज मध्ये दोन पूल आणि दोन बोगदे तयार केले जात आहे जे की या प्रकल्पाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य देखील आहे. या पॅकेज मध्ये तयार होणारे बोगदे हे देशातील सर्वाधिक रुंदीचे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचे बोगदे आहेत.
तसेच या प्रकल्पांतर्गत तयार होणारे दोन पूल हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तयार केले जात असून यावर वाहने चालवण्याचा अनुभव प्रवाशांसाठी निश्चितच चित्त थरारक राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या पॅकेज 14 मध्ये तयार केल्या जाणाऱ्यां बोगद्यांचे काम 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि मात्र दोन वर्षांच्या काळात या बोगद्याचे काम देखील पूर्ण करण्यात आले आहे.
तसेच या प्रकल्प अंतर्गत तयार होणाऱ्या ब्रिजचे काम देखील वेळेतच होणार आहे. सध्या फक्त बोगद्याच्या आतील भागात किरकोळ काम सुरु आहे. 1.2 किमी लांबीच्या दोन ब्रिजचे काम हे बोगद्यांनंतरचे दुसरे सर्वात आव्हानात्मक काम होते.
पॅकेज 14 ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, समृद्धी महामार्गच्या पॅकेज-14 मध्ये 7.78 किमी लांबीचे दोन बोगदे विकसित केले जात आहेत. तसेच दोन ब्रिज, एक इंटरचेंज, एक टोल प्लाझा आणि इतर बाबीचा देखील या टप्प्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा टप्पा 13 किमी लांबीचा आहे.
हा टप्पा नाशिकच्या इगतपूरी येथील पिंपरी सदोशी ठाण्यातील वशाळा बुद्रुकशी जोडणारा आहे.आता या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा भाग कार्यान्वित झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील विकासाला गती प्राप्त होणार आहे. या पॅकेज 14 मध्ये आठ किलोमीटर लांबीचे 2 बोगदे तयार केले जात असून हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचे बोगदे राहणार आहेत तसेच या बोगद्याची रुंदी 17.6 मीटर असून हा भारतातील सर्वाधिक रुंद बोगदा आहे.
यात आधुनिक अग्निशमन आणि सुरक्षा यंत्रणां देखील बसवण्यात आल्या आहेत. अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा देखील यात वापरण्यात आली आहे. तसेच या 13 किलोमीटरच्या रस्त्यात 2 ब्रिज, 1 इंटरचेंजही विकसित केले जाणार आहेत.
हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांसाठी आनंदी बातमी ! ‘या’ मार्गांवर इलेक्ट्रिक शिवनेरी बस सूरू, संपूर्ण वेळापत्रक आणि तिकीट दर, पहा….
याशिवाय या पॅकेज 14 अंतर्गत येणाऱ्या पुलाचे काम देखील मोठ आव्हानात्मक होत. पुलाची लांबी 1.2 किमी असून यात एकूण 35 पिअर्स म्हणजे खांब उभारण्यात आले आहेत. विशेष बाब अशी की, यात सर्वात उंच खांब हा 60 मीटरचा बनवण्यात आला आहे. आता या पॅकेज 14 चे काम हे जवळपास पूर्ण झाले असून लवकरच संपूर्ण समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाचे संपूर्ण बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. यामुळे या वर्षाखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला समृद्धी महामार्ग संपूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकतो असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बंद झालेली एक्सप्रेस ट्रेन पुन्हा होणार सुरू, केव्हा धावणार? पहा….