Samudrik Shastra : सामुद्रिक शास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक भाग आहे. ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे जन्म कुंडली वरून तसेच राशीवरून आपले भविष्य पाहता येते. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीच्या जडणघडण वरून त्याचे भविष्य कसे राहू शकते त्याची व्यक्तिमत्व कसे असू शकते या संदर्भात अंदाज बांधता येतो.
खरे तर प्रत्येक व्यक्तीत काही ना काही वेगळेपण असते. प्रत्येकाची शारीरिक जडण-घडण आणि शारीरिक वेगळेपण आपल्याला सहज जाणवते. मात्र हेच शारीरिक जडणघडण व्यक्तीचा स्वभाव अधोरेखित करत असते. सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीच्या पायाच्या तसेच हाताच्या बोटावरून त्याचा स्वभाव समजतो. एवढेच नाही तर व्यक्तीचे गाल कसे आहेत यावरूनही त्याचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व अधोरेखित होऊ शकते. आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत.
लाल गाल : काही लोकांच्या गालावर लालसरपणा दिसतो, म्हणजेच ते लाल रंगाचे दिसतात. हे लोक रागीट स्वभावाचे असतात असे सामुद्रिक शास्त्रात म्हटले गेले आहे. एवढेच नाही तर अशा लोकांमध्ये संयमाचा अभाव असतो. अर्थातच या लोकांचा संयम लवकर सुटतो. यांना राग लवकर येतो. हे लोक तणावात देखील लवकर जातात. मात्र या लोकांची एक विशेषता म्हणजे यांच्यात आत्मविश्वास खूपच अधिक असतो आणि याच्या जोरावर ते स्वतःहून मोठी कामे करू शकतात. हे लोक धाडसी व्यक्तिमत्व असणारे असतात.
मऊ गाल : काही लोकांचे गाल खूप मऊ आणि फुगीर असतात. सामुद्रिक शास्त्रात अशा लोकांचे देखील वर्णन करण्यात आले आहे. सामुद्रिक शास्त्र म्हणते की असे लोक त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट सहज साध्य करतात. ते समृद्ध आणि आनंदी जीवन जगतात. त्यांना चैनीची कमतरता कधीच भेडसावत नाही. या लोकांची बौद्धिक पातळी इतरांपेक्षा कमी असते, तरीही त्यांना यश मिळते.
गव्हाळ्या रंगाचे गाल : काही लोकांचे गाल गव्हाच्या रंगाचे असतात. हे लोक स्वभावाने चांगले असतात. मात्र या लोकांना कधी कधी अडचणीचा सामना करावा लागतो. त्यांना जीवनात संघर्षांचा सामना करावा लागतो. ते कठोर परिश्रम करतात परंतु कधीकधी त्यांना चांगले परिणाम मिळत नाहीत.
कडक गाल : काही लोकांचे गाल खूप कडक असतात आणि त्यांना स्पर्श केल्यावर कोरडे वाटते. अशा लोकांबाबतही सामुद्रिक शास्त्रात मोठी माहिती आहे. यानुसार असे लोक अनेकदा काळजीत बुडलेले पाहायला मिळतात. हे लोक स्वभावाने रागीट आणि चिडखोर असतात. त्यांना काहीही कारणावरून खूप लवकर वाईट वाटते. या लोकांना जीवनात यश आणि संपत्ती मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. पण हे लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वी होतात.
पांढरे गाल : काही लोकांचे गाल पूर्णपणे पांढरे असतात. लोक बहुतेकदा याला अशक्तपणाचे कारण देतात, परंतु जर आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोललो तर हे लोक थोडे आळशी असतात. सामुद्रिक शास्त्रातचं याबाबत वर्णन देण्यात आले आहे. तसेच, हे लोक जीवनात त्वरीत भ्रमित होतात आणि त्रस्त राहतात. कोणताही निर्णय घेण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो. अशा लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसून आली आहे.